८ जुलैपर्यंत फी भरण्याचे ‘बालभारती’चे फर्मान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

गुहागर - फीवाढीमुळे वादग्रस्त ठरलेल्या बालभारती पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने ८ जुलैपर्यंत सर्व फी भरावी, असे फर्मान काढल्याने पालक संतापले आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून निराशा झाल्यामुळे त्यामुळे शासनाने यातून मार्ग काढावा, अशी विनंती पालकांनी आज तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे केली. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी किल्लेदार व पोलिस निरीक्षक पोळ उपस्थित होते.

याआधी पालकांनी आंदोलन केले, तेव्हा पंचायत समिती शिक्षण विभाग पाठपुरावा करेल, असे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रदिनीचे आंदोलन पालकांनी मागे घेतले होते; मात्र शाळेने आता फर्मानच काढले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करून फीवाढीचा निर्णय व्हावा, अशी पालकांची मागणी आहे. एप्रिल महिन्यापासून बालभारती पब्लिक स्कूलमधील फीवाढीचा विषय गाजत आहे. पालकसभेत शाळेच्या जमा-खर्चाची मागणी केली. त्यावर शाळा व्यवस्थापनाने कोणतेही आश्वासन दिले नाही. प्रोसिडिंग पालक प्रतिनिधींना दाखविले नाही. त्यामुळे महाराष्ट्रदिनी आंदोलन करण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता; मात्र गटशिक्षणाधिकारी किल्लेदार यांनी मध्यस्थी केली होती. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर शाळा व्यवस्थापनाने तीन महिन्यांच्या फीची मागणी पालकांकडे केली. त्यामुळे पुन्हा एकदा पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तहसीलदार सौ. पाटील, गटशिक्षणाधिकारी किल्लेदार व पोलिस निरीक्षक पोळ यांच्या उपस्थितीत व्यवस्थापनाने पालकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली. त्यामुळे शासनाच्या नियमांप्रमाणे फी असावी, त्यासाठी तालुका प्रशासनाने लक्ष घालावे अशी विनंती पालकांनी अधिकाऱ्यांना केली आहे. तहसीलदारांनी ७ जुलैपर्यंत शाळा प्रशासन आणि पालकांची सभा बोलावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पालकांना दिले आहे.

Web Title: konkan news guhagar news Balbharti