प्रजासत्ताक दिनी आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी

लक्ष्मण डुबे
शनिवार, 27 जानेवारी 2018

घेरा माणिक गडाच्या डोंगर रांगा लगतच्या सारसईतील धनगर वाडी, सोनारवाडी, टपोरा वाडी, बागेची वाडी, टोकाची वाडी, गोविंदाची वाडी, आदि आठ वाड्यांतील 140 आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आणि किरकोळ आजर आढळणा-यांना मोफत औषध देण्यात आली. 

रसायनी : रसायनीतील आपटा ग्रामपंचायतीवर हाद्दीतील सारसईतील धनगर वाडा येथे वासांबे मोहोपाडा येथील श्री समर्थ क्लिनिक आणि श्री साई क्लिनिक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजास्ताक दिनी (शुक्रवार) आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 

घेरा माणिक गडाच्या डोंगर रांगा लगतच्या सारसईतील धनगर वाडी, सोनारवाडी, टपोरा वाडी, बागेची वाडी, टोकाची वाडी, गोविंदाची वाडी, आदि आठ वाड्यांतील 140 आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आणि किरकोळ आजर आढळणा-यांना मोफत औषध देण्यात आली. 

शिबिरासाठी डॉ युवराज म्हशेळकर, डॉ प्रतिभा महिंद्रकर, डॉ युगंधरा काकडे, तसेच दर्शन शिंदे, प्रियांका ऊंडे, अनिकेत शिर्के या सहका-यांनी आरोग्य तपासणी केली. तसेच ग्रामस्थांना आरोग्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, परस्पर सहकार्य आणि ग्रामविकास या संबंधीचे अनमोल मार्गदर्शन केले. पनवेल तालुका धनगर समाज उपाध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी शिबीराला सहकार्य केले. 

Web Title: Konkan news health cheaking tribal people