ज्येष्ठ साहित्यिक झुंबरलाल कांबळे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

महाड - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. झुंबरलाल कांबळे (वय 80) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता.29) निधन झाले. त्यांच्या "मुक्तिसंग्राम' या ग्रंथाला सरकारचा 1978-79 मध्ये उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला होता. 

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही झुंबरलाल यांनी काम केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीचा इतिहास "मुक्तिसंग्राम' या पुस्तकरूपाने जिवंत केला. या पुस्तकाचा अभ्यासकांकडून संदर्भग्रंथ म्हणून वापर केला जातो. कांबळे यांनी "पंढरीनाथ महाराज', "नागपूरची धम्मक्रांती', "डॉ. बाबासाहेबांच्या सहवासातील सुवर्णक्षण' आदी पुस्तकांचही लेखन केले होते.

Web Title: konkan news mahad Veteran literary writer Jambalalal Kamble passed away