नांदगाव महावितरण कार्यालय वर्षभर अधिकाऱ्यांविना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नांदगाव - येथील महावितरण कार्यालयाचा कारभार पूर्णतः रामभरोसे असून गेले वर्षभर या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नाही. उन्हाळ्यात साफसफाई  न झाल्याने पावसाच्या सुरूवातीपासून वीजेचा लपंडाव, भरमसाठ येणारे वीजबिल यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. असाच प्रकार सुरू राहिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा असलदे उपसरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे. 

येथील कार्यालयात गेले वर्षभर अधिकारी नाही. पावसाळ्याच्या सुरूवातीस वीज वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या न तोडल्याने पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. तसेच वीज बिलेही जास्त येत आहेत. याबाबत तक्रार देण्यासाठी कार्यालयात गेल्यास अधिकारी उपस्थित नसतात. येथील कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने दोन - तीन दिवस वीज नसते. या सर्वाचा नाहक त्रास वीजग्राहकांना होतो. या कार्यालयाच्या हद्दीत नांदगाव, तोंडवली, बावशी, ओटव, माईण, कोळोशी, असलदे, आयनल ही गावे येतात. या गावांच्या व्याप्तीनुसार कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. 

महिन्यात दोन अपघात
जून महिन्यात विजेच्या तुटलेल्या तारांचा धक्का बसून कादर साटविलकर यांची ९० हजाराची किमतीची म्हैस मृत्युमुखी पडली. तर असलदे येथील परशुराम परब यांचा ६० हजार किमतीचा बैल ठार झाला. तरी या महावितरणला जाग आलेली नाही.

Web Title: konkan news mseb