खेडमध्ये जगबुडी-नारंगीचे पाणी घुसले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

खेड - गेले चार दिवस खेड शहर आणि तालुक्‍यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत १०१ मि.मी. पावसाची नोंद तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. सुदैवाने खेडच्या बाजारपेठेत पाणी भरले नाही. खेड शहरातील सुर्वे इंजिनिअरिंग रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या सखल भागात भरले. दुपारनंतर ते ओसरले.

खेड - गेले चार दिवस खेड शहर आणि तालुक्‍यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत १०१ मि.मी. पावसाची नोंद तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. सुदैवाने खेडच्या बाजारपेठेत पाणी भरले नाही. खेड शहरातील सुर्वे इंजिनिअरिंग रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या सखल भागात भरले. दुपारनंतर ते ओसरले.

खेड-दापोली मार्गावरील वाहतूक रात्री १ वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद होती. पर्यायी रस्ता म्हणून शिवतर रोड मार्गे डेंटल कॉलेज मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. अवजड वाहनांना प्रवेश बंद होता. नारंगी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात विस्तारल्याने पुराचे पाणी भडगाव, सुसेरी, खेड शहरातील सखल भागांत घुसले. डेंटल कॉलेजसमोरील शेती असलेल्या भागात पुराचे पाणी भरले. या 

पुराच्या पाण्याने येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षी २२ सप्टेंबरला असाच पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. काल दिवसभर  जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने खेड नगरपालिकेने नागरिकांना धोक्‍याचा इशारा दिला होता. 

तसेच सावधानता म्हणून रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान पालिकेने तीन वेळा भोंगा वाजवला होता. शहरातील व्यापाऱ्यांना हा भोंगा वाजणे म्हणजे पुराचे पाणी भरणार असा संकेत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील मालाची आवराआवर करण्यास सुरवात केली. काही व्यापाऱ्यांना पावसाचा अंदाज आल्याने त्यांनी आपल्या दुकानातील माल आधीच माळ्यावर ठेवला होता. त्यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही. नगरपालिकेचे मटण आणि मासळी मार्केट पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. जुन्या कुडाळकर बिल्डिंगपर्यंत पाणी आले होते. 

भरणे नाका येथील जगबुडी नदीवर असलेल्या  पुलाला पाणी लागले होते. जगबुडी नदीवर असलेला कोल्हापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नातूवाडी धरण पूर्णपणे भरले आहे. धरणातून आवश्‍यकतेनुसार पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोकण रेल्वे कोलमडली...
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेला बसला. वेळापत्रक पूर्ण कोलमडले असून अनेक गाड्या पनवेलवरूनच मागे वळविण्यात आल्या आहेत. मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या अद्यापही सुटलेल्या नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दुपारी ३.३० ला सुटणारी मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस, सायंकाळी ५ वाजता सुटणारी कोचिवली-एलटीटी अद्याप सुटलेल्या नाहीत. रत्नागिरीतून दादरला गेलेली पॅसेंजर गाडी अजूनही दादरला पोचलेली नाही. मांडवी एक्‍स्प्रेस पनवेलपर्यंत रोखण्यात आली असून रात्री सुटणारी कोकणकन्या तेथूनच सोडण्यात येणार आहे. राज्यराणी एक्‍स्प्रेसही उशिरा सुटेल असे सांगण्यात आले.

Web Title: konkan news rain narangi river