अभियानात नव्हे, सातत्याने हवी स्वच्छता

राजेंद्र बाईत
मंगळवार, 16 जानेवारी 2018

‘स्वच्छ आणि सुंदर’ राजापुरात नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्वच्छतेमध्ये सातत्य राहावे, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. सातत्यपूर्ण लक्षवेधी कामगिरी बजावताना राजापूर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत कोकण विभागात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्वच्छता अभियान हे केवळ अभियान न होता लोकचळवळ होण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रगती साधत वाटचाल यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.

लोकसहभागातून पालिकेने राबविलेल्या अभियानाला लोकांसह व्यापाऱ्यांचेही पाठबळ मिळत आहे. डोअर टू डोअर कचरा गोळा करताना जनप्रबोधन केले जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर उभारण्यात आलेल्या कंपोस्ट खत प्रकल्पाच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावली जाते. या अभियानात बचत गटाच्या महिला, विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. सचित्र बोलक्‍या भिंती स्वच्छतेचे संदेश देत आहेत.

भविष्यात प्लास्टिकचा सदुपयोग 
शहरामध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्यामध्ये ओला आणि सुका कचऱ्याच्या सोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकही सापडते. त्यापैकी बाटल्यांचा लिलाव करून पालिकेने विल्हेवाट लावली तरी भविष्यामध्ये प्लास्टिकचा शहर विकासासाठी उपयोग करणार आहे. प्लास्टिक क्रश करणारे यंत्र खरेदी करून ते रस्त्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

सातत्यपूर्ण लोकसहभागाचे आव्हान
स्वच्छता अभियान सध्या प्रभावीपणे राबविले जात असले तरी, लोकसहभागातून त्यामध्ये सातत्य राखण्याचे खरे आव्हान आहे. सातत्यपूर्ण लोकसहभाग राहिल्यास स्वच्छता अभियान निश्‍चितच एक लोकचळवळ होईल. मात्र त्यामध्ये जनतेने योगदान देणे गरजेचे आहे. उघड्यावर कचरा न टाकता कचराकुंडीमध्येच कचरा टाकायचा ही मानसिकता हवी.

‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता त्यामध्ये सातत्य ठेवताना भविष्यामध्ये स्वच्छता अभियान एक लोकचळवळ म्हणून उभी करण्याचा मानस आहे. त्यासाठी लोकांसह समाजातील सर्व घटकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होताना आपापल्यापरीने योगदान देणे गरजेचे आहे.
- नयन ससाणे, मुख्याधिकारी

कचरा वाहतूक आणि गोळा करण्यासाठी वाहने - ३ (डंपर, ट्रॅक्‍टर, ट्रिपर)
दरदिवशी गोळा होणारा कचरा - ५.३१५ मेट्रिक टन (शहरातील लोकांकडून ४.८८ मेट्रिक टन, बाहेरून येणाऱ्या लोकांकडून ०.४८७ मेट्रिक टन)
दरदिवशी निर्माण होणारा कचरा - ओला कचरा - २.२०० मेट्रिक टन, सुका कचरा - ३.११५
कचरा कुंड्या - घरोघरी - ५९७६ सार्वजनिक कचरा कुंड्या ः २२
स्वच्छतादूत - ॲड. जमीर खलिफे, उपनगराध्यक्ष, सौरभ खडपे, नगरसेवक, अरुण जाधव, सफाई कामगार

Web Title: konkan news rajapur municipal cleaning