रायगड जिल्ह्यातील रसायनीत दुबारा भाताच्या पिकावर खोडकिडा 

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 29 जानेवारी 2018

रसायनी परीसरातील बहुतेक शेतक-यांनी आवनी, जया, रत्ना, सोना कोलम आदि भाताच्या जातीच्या लावणी केली आहे. मोहोपाडा येथील शेतक-यांची भात लावणीची काम उरकली आहे. दरम्यान साधारण एक महिन्यापुर्वी लावणी केलेल्या भाताच्या पिकावर खोडकिडा रोग पडला आहे.

रसायनी : रसायनीतील मोहोपाडा परीसरात काही शेतक-यांच्या दुबारा भाताच्या पिकावर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. यंदाच्या वर्षी भाताच्या पिकाला लवकर निसर्गाच्या लहरीपणाचा फटाका बसु  लागल्याने शेतकरी पुरतेच हतबल झाले आहे. 

चावणा पंचक्रोशीतील शेतक-यांना जांभिवली येथील बामणोली धरणाच्या आणि पाताळगंगा नदी काठच्या काही गावातील शेतकरी नदीच्या पाण्यावर भाताचे व भाजी पाल्याचे पिक घेत आहे. तर मोहोपाडा येथील शेतकरी येथील एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्रातुन सोडले जाणा-या सांडपाण्यावर तसेच काही शेतकरी मोहोपाडा येथील नागरी वस्तीतील सांडपाण्यावर भाताचे पिक घेत आहे.  

रसायनी परीसरातील बहुतेक शेतक-यांनी आवनी, जया, रत्ना, सोना कोलम आदि भाताच्या जातीच्या लावणी केली आहे. मोहोपाडा येथील शेतक-यांची भात लावणीची काम उरकली आहे. दरम्यान साधारण एक महिन्यापुर्वी लावणी केलेल्या भाताच्या पिकावर खोडकिडा रोग पडला आहे. किडे भाताच्या खोडा जवळ पान कुरताडत असल्याने रोप पिवळी पडुन वाळु लागली आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहे. तर पिक वाचविण्यासाठी शेतकरी किटक नाशक औषध फवारणी करू लागले आहे. लावणी नंतर काही दिवसांनी चार पाच दिवस हवामान ढगाळलेले होते. या खराब हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याची भिती वामन दळवी आणि इतर शेतक-यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Konkan news rice crop in rasayani