हिम्ब्ज हॉलिडे फसवणुकीत मुख्य सूत्रधाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गनगरी - हिम्ब्ज हॉलिडे प्रा. लि. नावाची कुडाळ येथे कंपनी स्थापन करून लोकांना मोठ्या रकमेची आमिषे दाखून लाखो रुपयांना लुबाडल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मंगेश शेर्लेकर (रा. झाराप) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रथम पाच दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली होती. यानंतर येथील जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन विशेष न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी त्याची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.

संशयित आरोपीतर्फे  वकील आशपाक शेख यांनी काम पाहिले. मंगेश शेर्लेकर यांच्यासह संचालकांनी हिम्ब्ज हॉलिडे नावाची कंपनी स्थापन केली. 

१८ जणांच्या या कंपनीच्या संचालकांनी कुडाळ येथे या कंपनीचे कार्यालय उघडले आणि वेगवेगळ्या योजनांद्वारे जिल्ह्यातील लोकांना मोठ्या रकमेची आमिषे दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बॅंकांचे चेकद्वारे पैसे स्वीकारले. त्यानंतर त्यांचे पैसे परत न करता त्यांची ३५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली होती. याबाबतची तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल केली होती. तक्रारीनुसार कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मुख्य सूत्रधार मंगेश मधुकर शेर्लेकर याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी शेर्लेकर याला सशर्त ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

Web Title: konkan news sindhudurg nagari crime