१९० विद्यार्थ्यांना चष्मा; २५ मुली अंशतः अंध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

देवरूख - दृष्टिदोषामुळे संगमेश्‍वर तालुक्‍यातील १९० शाळकरी मुलांना चष्मा लागला आहे. यात अंशतः अंध असलेल्या २५ मुलींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत ‘लार्ज प्रिंट’ पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या पाठ्यपुस्तकांमधील अक्षरांचा फॉन्ट मोठा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याचे सहजपणे वाचन करता येईल.

सर्व शिक्षण अभियानातून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. अपंगांना शिकवणाऱ्या शिक्षकांचीही विशेष तपासणी केली जाते. सहा महिन्यांपूर्वी विशेष प्रशिक्षित शिक्षकांद्वारे तपासणी करण्यात आली होती. यावेळी १९० विद्यार्थ्यांना चष्मा लागल्याचे आढळून आले. त्यांची वाचन परीक्षा घेण्यात आली. त्यात २५ मुली अंशतः अंध असल्याचे निष्पन्न झाले. कमजोर नजरेच्या मुलींनाही पाठ्यपुस्तके वाचता आली पाहिजेत, यासाठी शासनाने आता ‘लार्ज प्रिंट’ पुस्तके छापण्याचा निर्णय घेतला आहे. लार्ज प्रिंटची ही पुस्तके त्या २५ मुलींना देण्यात येणार आहेत. अशा प्रकारची पुस्तके गतवर्षी ज्यांना देण्यात आली होती ती शासनदरबारी जमा करून घेतली जाणार आहेत. नवीन पुस्तकांचा संच शाळेत तर जुन्या पुस्तकांचा संच घरी अभ्यासासाठी या मुलांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. गतवर्षी ३२ मुलांसाठी ही पुस्तके मागविण्यात आली होती.

तालुक्‍यात विविध प्रकारच्या दिव्यांग मुलांमध्ये ७८९ जण निष्पन्न झाले. यात अल्प दृष्टी असलेले १९०, पूर्ण अंध असलेला १, कर्णबधिर ५३, अस्थिव्यंग ७५, मतिमंद २१९, वाचा दोष असलेली ६१ तर इतर १९० अशी वर्गवारी आहे. या मुलांवर शिक्षण विभागाचे बारीक लक्ष राहणार असून त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

Web Title: konkan news student blind sarv shiksha abhiyan