Why does the Pavsha bird call before rain?
esakal
संगमेश्वर : पेरते व्हा, पेरते व्हा, अशी पावशा पक्ष्याची शीळ रानावनात घुमायला लागली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात हिरवे स्वप्न तरळू लागले आहे. पावसाचा शुभसंकेत देणारा पावशा पक्षी सध्या कोकणच्या विविध भागांत ओरडताना ऐकू येत (Pavsha bird monsoon prediction in Konkan) आहे. शेतशिवारात आता कामांची लगबग वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतशिवारात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस वेळेवर आला तर आपली पंचाईत नको म्हणून प्रत्येक शेतकरी मशागत करण्यात व्यस्त झाला आहे.