'कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका, आपल्यासमोर कोणी शेठ चालत नाही'; राणेंनी आमदार जाधवांना पुन्हा डिवचलं

कोकणात राणे व भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हा वाद जुना आहे.
Konkan Politics Nilesh Rane
Konkan Politics Nilesh Raneesakal
Summary

'ही जमीन गाईंसाठी आहे. गाईंच्या रक्षणासाठी आहे. ती इतर कोणत्याही कामासाठी जाऊ देणार नाही.'

चिपळूण : कोकणात राणे व भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हा वाद जुना आहे. राणे व जाधव एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोटे येथे झालेल्या कार्यक्रमात नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी आमदार भास्कर जाधवांना लक्ष्य केले.

गोशाळेच्या जुन्या वादाचा मुद्दा पकडून आपल्यासमोर कोणी शेठ चालत नाही. सगळ्यांचे गेट बंद. सोडणार नाही, असे सांगून आमदार जाधवांचे नाव न घेता त्यांच्यावर राणेंनी निशाणा साधला. यामुळे आगामी काळात पुन्हा राणे व जाधव यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.

लोटे येथील गोशाळेत भगवान कोकरे महाराज यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय गो संमेलनास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व माजी खासदार नीलेश राणे यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री राणे यांनी आमदार जाधवांवर बोलणे टाळले; मात्र नीलेश राणे यांनी आमदार जाधवांना पुन्हा एकदा डिवचले.

Konkan Politics Nilesh Rane
ऐतिहासिक वारसा लाभलेलं 'धर्मगिरी तीर्थक्षेत्र'; जैन धर्मियांची आहे पावन भूमी, या ठिकाणी कसे पोहोचाल?

नीलेश राणे म्हणाले, ‘‘कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका. अचानकपणे हे माझ्याकडे आले आणि सांगितले की, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्यांना मी एकत्र करतो. त्यानंतर एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलावलं तसेच कधी एक रुपयाची मागणीही केली नाही. या माणसाने मोठ्या धाडसाने गोशाळा उभी केली. भगवान कोकरे महाराज गोसेवा करत आहेत त्यांना मदत नाही करायची तर कोणाला करायची?

Konkan Politics Nilesh Rane
Maratha Reservation : अधिसूचनेत कुणबींच्या सग्यासोयऱ्यांनाही दाखले; बावनकुळे म्हणाले, तो अंतिम मसुदा नाही..

तुम्हाला हवंय काय जमीनच ना? नाही देत जा, असे भास्कर जाधवांना उद्देशून नीलेश राणे म्हणाले, ही जमीन गाईंसाठी आहे. गाईंच्या रक्षणासाठी आहे. ती इतर कोणत्याही कामासाठी जाऊ देणार नाही. तशी मागणीही आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे प्रस्तावही गेले आहेत म्हणून कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका, कोणी शेठ आपल्यासमोर चालत नाही.

Konkan Politics Nilesh Rane
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना 'या' राज्यातून दिली जाणार राज्यसभेसाठी उमेदवारी?

मुक्कामीच गुहागरमध्ये येतो

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा उल्लेख करत राणे म्हणाले, ‘मी साठे यांना सांगितले, पक्षाला सांगा मला प्रभारी करा. मी उद्यापासून सामान घेऊन येतो. गुहागरमध्ये आणि यांना पुन्हा घरी पाठवू.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com