esakal | कोकण रेल्वे आली आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी ; या नंबरवर संपर्क करा
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Railway crosses for mango transportation kokan marathi news

आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वे सरसावली.कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी माल वाहतूक करणारी गाड्या (24/7) चालवित आहे.

कोकण रेल्वे आली आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी ; या नंबरवर संपर्क करा

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी -  आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वे सरसावली.कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी माल वाहतूक करणारी गाड्या (24/7) चालवित आहे. लॉकडाऊनचा परिणाम कमी करण्यासाठी पुढील काही दिवसांत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा- घर बैठे ट्रान्सपोर्ट पास हवा आहे मग या लिंकवर क्लिक करा.....

विशेष ट्रेनची सुविधा

 मागणी कायम राहिल्यास कोकण रेल्वे केआर विभाग ते भारतीय रेल्वेवरील विविध स्थानकांकरिता विशेष पार्सल ट्रेन चालवण्यास सज्ज आहे. पार्सल ट्रेनमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर नाशवंत वस्तू जसे की फळ आंबा आणि भाज्या यांचा समावेश  आहे.

हेही वाचा-ब्रेकिंग - इस्लामपुरातील आणखी एकाला कोरोनाची लागन

या नंबरवर करा संपर्क
इच्छुक ग्राहक आपली सामग्री वाहतूक करू इच्छित असल्यास त्यांच्या आवश्यकतेसह वरिष्ठ कमर्शियल मॅनेजरला मोबाइल नंबर 9004470394 वर किंवा कोकण रेल्वेच्या पार्सल कार्यालयांवर संपर्क साधू शकतात.या कठीण काळात कोकण रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे,  असे रेल प्रशासनाने सांगितले आहे.

loading image