प्रवाशांनो वेळेत स्थानकात या, अन्यथा तुमची ट्रेन चुकू शकते

राजेश कळंबटे
Tuesday, 27 October 2020

यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे.

रत्नागिरी : वारंवार सूचना करून ही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे. आज पासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वे म्हणजेच रत्नगिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात आज पासून या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे.

हेही वाचा - राज्यात पुन्हा एकदा हाय होल्टेज; तळ कोकणातल्या राजकारणावर प्रभाव -

कोव्हिडचा धोका पूर्णतः टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी होत आहे. याकरीता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांची किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे असे अवाहन गेले काही दिवस कोकण रेल्वे करत आहे. या आवाहनाला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते.

आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे. कोव्हिडचा प्रसार होऊ नये, यासाठी कोकण रेल्वे सर्व खबरदारी घेत आहे. प्रवाशांच्या आरोग्य हिताचे उपाय केले जात आहेत. या सगळ्या करीता कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे आज पासून तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर निर्धारित वेळे पूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहचा. अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची ट्रेन चुकू शकते...

 

हेही वाचा -  शेतकऱ्यांनो आंबा व काजू फळपिक विमा उतरवला का ? नोव्हेंबरपर्यंतच मुदत -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan railway route declared for travellers to come in station as early possible to travel by train in ratnagiri