बोगद्याचे काम पूर्ण ; कोकण रेल्वेची वाहतूक झाली सुरु

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

कोकण रेल्वे मार्गावर सध्या ट्रेन क्रमांक ०२६१७ ही एर्नाकुलम जंक्‍शन ते निजामुद्दीन स्पेशल एक्‍स्प्रेस धावत आहे. 

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावारील गोवा-पेडणे येथील बोगद्याचे दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक १६ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या मार्गावरील एलटीटी ते मडगाव ही डबलडेकर गाडी आठवड्यातून एकदा धावत आहे. कोकण रेल्वे मार्गावर सध्या ट्रेन क्रमांक ०२६१७ ही एर्नाकुलम जंक्‍शन ते निजामुद्दीन स्पेशल एक्‍स्प्रेस धावत आहे. 

ही गाडी आता मडगाव, रोहा, पनवेल, कल्याण मार्गावर धावेल. परतीसाठी ०२६१८ ही गाडी निजामुद्दीन ते एर्नाकुलम जंक्‍शन, कल्याण, पनवेल, रोहा, मडगाव, मंगळूरू मार्गावर धावेल. गाडी क्रमांक ०२२८४ ही निजामुद्दीन ते एर्नाकुलम डूरंटो स्पेशल एक्‍स्प्रेस वसई रोड, पनवेल, रोहा, मडगाव, मंगळूरू मार्गावर धावेल. परतीसाठी ०२२८३ ही गाडी याच मार्गाने धावेल.

हेही वाचा - बॅंकेच्या शाखा व्यवस्थापिकेचा खून करून मृतदेह खाडीत फेकला, कोकणात सात लाखांसाठी कुठे घडला प्रकार 

गाडी क्रमांक ०२४३२ आणि ०२४३१ नवी दिल्ली - तिरुवअनंतपूरम राजधानी एक्‍स्प्रेस, गाडी क्रमांक ०६३४५ व ०६३४६ ही लोकमान्य टिळक (टी) ते तिरुवअनंतपूरम विशेष एक्‍स्प्रेस नियमित मार्गावरून पुन्हा सुरू झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर दिली आहे. 

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील डबलडेकर गाडी दर शनिवारी लोकमान्य टिळक स्थानकातून रात्री १.१० वाजता सुटून मडगावला रविवारी दुपारी १.३० वाजता पोहचेल. परतीसाठी मडगाव येथून रविवारी सकाळी ११.३० वाजता सुटून एलटीटीला रात्री ११.५५ वाजता पोहचणार आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत सावरकरांच्या संगीत नाटकाला नव्वद वर्षे झाली पूर्ण 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan railway route start again from ratnagiri and konkan section with time table