esakal | Good News - कोकण रेल्वेचा प्रवास होणार आणखी वेगवान
sakal

बोलून बातमी शोधा

Good News - कोकण रेल्वेचा प्रवास होणार आणखी वेगवान

Good News - कोकण रेल्वेचा प्रवास होणार आणखी वेगवान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : कोकण रेल्वेवरील (kokan railway) प्रवास येत्या चार महिन्यानंतर वेगवान तसेच विनाअडथळा होणार आहे. कोरोनामुळे रेंगाळलेले रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरण येत्या चार महिन्यात पूर्ण होणार आहे. याशिवाय महत्वाकांक्षी असलेला क्रॉसिंग स्थानक (crossing station) प्रकल्पही पूर्ण झाला असून प्रवास सुरळीत होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. (rantagiri)

कोकण रेल्वेवरून प्रत्यक्षात कोकण व त्यामार्गे जाणाऱ्‍यांची संख्या अधिक आहे. याशिवाय मालवाहतूकही मोठया प्रमाणात होते. सध्या दोनच मार्ग असल्याने गर्दीच्या काळात अधिक संख्येने गाड्या सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते. त्यामुळे कोकण मार्गावरील प्रवास सुकर करण्यासाठी रोहा ते ठोकूर असे ७०० किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला होता; परंतु अनेक अडचणी पाहता रोहा ते वीर या ४६ किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेतले.

हेही वाचा: कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तरुणाची बर्थडेलाच आत्महत्या

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले हे काम अंतिम टप्प्यात आहे. ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम चार महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्‍यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाबरोबरच एकमेकांना रुळ ज्या ठिकाणी (क्रॉस) छेदतात, अशा ठिकाणी क्रॉसिंग स्थानक प्रकल्पाचे कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत आठ नवीन स्थानके होणार आहेत.

प्रकल्पाचा खर्च २०२ कोटी

डिसेंबर २०१९ मध्ये हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होणार होते. परंतु तांत्रिक कारणे, कोरोना, टाळेबंदीमुळे प्रकल्प कामे रेंगाळली होती. या प्रकल्पाचा खर्च २०२ कोटी रुपये आहे. यामध्ये रुळांच्या जोडणीपासून बरीच कामे करण्यात आली. एखाद्या ठिकाणी रुळ हे एकमेकांना छेदत असतील तर अशा ठिकाणी दोन लांब पल्ल्याच्या गाडया एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वेळ वाया जातो. हा वेळ वाचावा आणि दोन्ही गाड्यांना मार्ग मोकळा मिळावा, यादृष्टीने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प हाती घेण्यात आला.

हेही वाचा: Good News: Whatsapp ग्रुप कॉलमध्ये मिळणार मोठी सवलत

आठ नवी स्थानके

जेथे रुळ एकमेकांना छेदतात, अशा ठिकाणी नवीन स्थानके उपलब्ध करण्यात येत आहेत. प्रकल्पांतर्गत इनजे, खारेपाटण, सापे वामाने, निळजे, कडवई, कालबनी, अर्चिणे, वेरवली ही नवीन स्थानके सेवेत येणार असून त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

loading image