#KonkanRain मुंबई-गोवा महामार्ग आठ तासानंतर सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

खेड - तालुक्‍यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्ग गेल्या चार दिवसांत बुधवारी (ता.10 ) दुसऱ्यांदा तब्बल आठ तास ठप्प झाला होता. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रात्री आठ वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आली. 

आज गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ही वाहतूक धिम्या गतीने सुरु करण्यात आली आहे. सायंकाळी 5 च्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 6 मीटरपर्यंत पोहोचली होती. पावसाचा जोर वाढल्याने आठ वाजता जगबुडीच्या पाण्याने धोक्‍याची पातळी गाठल्यामुळे तहसीलदार शिवाजी जाधव यांनी पुलावरून होणारी वाहतूक थांबवण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिले. यानंतर पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्‌स उभारून पुलावरील वाहतूक बंद केली.

दरम्यान मुंबई येथून चिपळूण, सिंधुदुर्ग व गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक खालापूर खोपोली मार्गे पुणे-बंगळूर महामार्गावर वळविण्यात आली होती. चिपळूणकडे जाणारी महामार्गावर रांगांमध्ये अडकलेली छोटी चारचाकी वाहने भरणे-शिवाजीनगर-भोस्ते पुलावरून रेल्वे स्टेशन मार्गे सोडण्यात आली मात्र अवजड वाहने पहाटे चार वाजेपर्यंत थांबविणयात आली. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी जगबुडी पुलावरील पाणी ओसरल्याने आज सकाळी साडेसहा वाजता वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rain Mumbai Goa highway starts