esakal | रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ; दरडी कोसळल्या, रस्ते खचले
sakal

बोलून बातमी शोधा

चापानेर परिसरात पावसाचा फटका केळीच्या बागाला बसला.

रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ; दरडी कोसळल्या, रस्ते खचले

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : वेगवान वार्‍यांसह जिल्ह्यात मुसळधार पावसाने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरीत (ratnagiri district) तोणदे येथे डोंगर खचला असून त्यात एका गोठा जमिनदोस्त झाला. जांभारीत घराजवळ दरड कोसळली. जिल्ह्यात चार ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार ठिकाणचे रस्ते खचले. संरक्षक भिंती कोसळण्यासह घरांची पडझड (konkan rain update) झाल्याने सहा लाखाचे नुकसान झाले आहे. गुहागर- कारुळ गावात भेगा पडल्यामुळे वीस घरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बुधवारी (२०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली. राजापूरमधील अर्जुना नदीला पूर आला आहे. पाणी जवाहर चौकात पोचले होते. त्यामुळे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार रत्नागिरी तालुक्यात वारंवार होत आहेत. तोणदे येथे डोंगराचा भाग खचल्याने हजारो टन माती खाली होती. पायथ्याशी असलेल्या रिकाम्या गोठ्यावर दरड कोसळल्याने ३ लाखाचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी काही अंतरावर कीरवाडी आहे. मात्र त्याला कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात चार हापूसची झाडे उन्मळून गेल्यामुळे नुकसान झाले. जांभारी-कुणबीवाडी येथे मंगेश रामा येलये यांच्या घरावर दरड कोसळली. सुदैवाने घराचे काहीच नुकसान झाले नाही. मिरजाळे-मधलीवाडीत जमीन खचली असून नेवरे येथे घरावर झाड पडून सिमेंटचे पाच पत्रे फुटले आणि एका घरांची भिंत पडली. खालगाव येथे एका, गावखडीत दोन घरांचे तर टिके-कांबळेवाडीत गोठ्यांचे नुकसान झाले.

हेही वाचा: निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळा पुन्हा उभा राहणार

पावसामुळे मंडणगडात आठ घरांचे दोन लाखाचे नुकसान झाले, दुधरेतील नळपाणी योजनेची विहीर कोसळली, वाल्मिकीनगरमधील एका घरातील वृध्द महिलेचे स्थलांतर केले तर एका घराजवळ संरक्षक भिंत कोसळली. दापोली तालुक्यात ओणनवसे-उंबरघर, लाडघर-बुरोंडी रस्ता खचला असून यासह पांगरी गुरव वाडीत भूस्खलन झाले. त्यामुळे २ घरांतील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. पाच घरांचे दीड लाखाचे नुकसान झाले. आंमणवायंगी-पंदेरी रस्त्यावर झाड कोसळली असून दरड हटवण्याचे काम सुरु होते. खेडमध्ये चार घरांचे दीड लाखाचे तर चिपळुणात पाच घरांचे साठ हजाराचे नुकसान झाले.

चिपळूण-देवपाट येथे रस्ता खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गुहागरला अतिवृष्टीमुळे वेलदूर-सिध्देश्‍वर रस्ता खचला असून कुडली-बंदरवाडीजवळ भूस्खलन झाले, भातगाव येथे उधळवाडीत मोरी खचली. तसेच पेवे येथे दोन घरांचे वीस हजाराचे तर काजू, नारळासह सुपारीची २१ झाडांचे नुकसान झाले. कारुळ येथे जमीनीला भेगा पडल्यामुळे वीस कुटुंबियांचे स्थलांतर केले आहे. चिपळूण-वेरळ रस्त्यावर दरड कोसळली असून ती हटविण्याचे काम सुरु आहे. संगमेश्‍वर कुरधुंडा येथे शाळेच्या भिंतीला भेगा गेल्या असून कोळंबेतही शेतामध्ये भेगा पडल्या आहेत. लांजा तालुक्यात पनोरे एका घराचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. राजापूरात तारल-चौकेत रस्ता खचला असून पन्हळेत दरड कोसळली होती. गणेशवाडीत डोंगराला भेगा पडल्या आहेत.

तालुका पाऊस (मिमी)

 • मंडणगड ५३.७०

 • दापोली ५९.१०

 • खेड ८३.९०

 • गुहागर ७५.७०

 • चिपळूण ९७.५०

 • संगमेश्वर १२४.९०

 • रत्नागिरी ९८.२०

 • लांजा १३१.३०

 • राजापूर ८४.२०

हेही वाचा: राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

 • १५ घरांची पडझड

 • २३ कुटुंबाचे स्थलांतर

 • ६ गावांत भूस्खलन

 • ५ ठिकाणी रस्ते खचले

 • आणखी २ दिवस अतिवृष्टी

loading image