कोकणातील विद्यार्थ्यांना कायद्याचे उच्च शिक्षण मिळेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

रत्नागिरी - रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण प्रगती केल्याचे गेल्या काही वर्षांतील आपण साक्षीदार आहोत. श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात एलएलएम विभाग सुरू झाल्याने कोकणातील विद्यार्थ्यांना कायद्याचे उच्च शिक्षण मिळेल. यामुळे कोकणातील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रामाणिक व कौशल्यपूर्ण काम करून वेगळा ठसा उमटवतील, असा विश्‍वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी व्यक्त केला.

एलएलएम विभागाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सोसायटीचे कार्याध्यक्ष ऍड. विलास पाटणे यांनी सांगितले, सोसायटी कोकणातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सर्वांगीण विकासासाठी व गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यात सहकारी पदाधिकारी, सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाटा आहे.

विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ऍड. राजशेखर मलुष्टे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सौ. यास्मीन आवटे यांनी स्वागत केले. प्रा. रोहित देव यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा न्यायाधीश श्री. डिगे, ऍड. अशोक कदम, ऍड. जी. एन. गवाणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठातर्फे क्‍लेपेंटिंगमध्ये आंतरविद्यापीठाचे बक्षीस मिळवणारा विधी महाविद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी धीरज साटविलकर याचा न्यायमूर्ती नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Konkan students will get law education