
चिपळूण : कोयना धरणातील (Koyna Dam) वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) कार्यवाही सुरू झाली आहे. पाणी वापराकरिता पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता कळंबस्ते येथे वाशिष्ठी नदी किनारी दिल्ली येथील संस्थेकडून मृदा परीक्षणाबरोबर भूगर्भ चाचणी घेण्यात आली.