Koyna hydel project wastewater for Konkan
esakal
चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीत सोडून दिले जाणारे अवजल कोकणाच्या विकासासाठी वापरण्याची संकल्पना गेली २७ वर्षे कागदावरच आहे. या काळात अनेक समित्या स्थापन (Koyna hydel project wastewater for Konkan) झाल्या. अभ्यास, अहवाल सादर झाले आणि तज्ज्ञांनी पर्यायही सुचवले; मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य राहिल्याने कोयनेच्या पाण्याचा प्रश्न केवळ चर्चा आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकल्याची तीव्र भावना कोकणवासियांमधून व्यक्त होत आहे. भविष्यात कोयना अवजल स्थानिकांना उपयुक्त ठरेल या दृष्टीने सत्ताधारी विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.