
Love Rejection Turns Fatal Best Friend Murders Teen Girl in Kudal
Esakal
कुडाळ तालुक्यातल्या घावनळे इथली दीक्षा तिमाजी बागवे ही १७ वर्षीय तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. तब्बल ५८ दिवसांनी तिचा मृतदेह वाडोस इथल्या बांटमाचा चाळा इथं आढळून आला. या प्रकरणी दीक्षाचा मित्र असलेल्या कुणाल कुंभार याला अटक करण्यात आलीय. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. गेल्या दीड वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखत होते. मात्र दीक्षाने प्रेमसंबंधाला नकार दिल्याच्या रागातून कुणालने तिची हत्या केली.