कुडाळात विजेचा लपंडाव सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कुडाळ - विजेच्या लपंडावाबाबत ग्राहकांत संतापाची लाट उमटत आहे. वीज यंत्रणेच्या या अनागोंदी कारभाराबाबत अशीच स्थिती राहिल्यास कार्यालयावर धडक मोहिमेशिवाय पर्याय नसल्याचा सूरही ग्राहकांतून उमटत आहे.

कुडाळ - विजेच्या लपंडावाबाबत ग्राहकांत संतापाची लाट उमटत आहे. वीज यंत्रणेच्या या अनागोंदी कारभाराबाबत अशीच स्थिती राहिल्यास कार्यालयावर धडक मोहिमेशिवाय पर्याय नसल्याचा सूरही ग्राहकांतून उमटत आहे.

सिंधुदुर्गात प्रचंड उष्मा असताना गेले काही दिवस वीज यंत्रणाचा अनागोंदी कारभार सुरु आहे. मंगळवारी दिवसभरात पंधरा ते वीस वेळा सेकंदाच्या फरकाने वीजेचा लपंडाव सुरु होता. मध्यरात्री तर तब्बल एक ते दीड तास वीज गेल्याने शहरासह ग्रामीण भागही अंधारात होता. वीज यंत्रणेच्या कारभाराबाबत संतापही व्यक्त करण्यात आला. अशीच परिस्थिती उद्‌भवल्यास वीज कार्यालयावर आंदोलनाचा इशारा ग्राहकांनी दिला. ग्रामीण भागात वीज यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी गेली बरीच वर्षे वीज कंत्राटी कामगार कार्यरत असतो; मात्र त्यांनी गेले दहा दिवस कामबंद आंदोलन पुकारल्याने त्याचा परिणामही असू शकतो. त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत तत्काळ पावले उचलली गेली नाही तर बरेच गाव अंधारात जाण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

Web Title: kudal news electricity