आठवड्यात मुसळधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

कुडाळ - येत्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. यामुळे खरिपाच्या पेरणीस सुरुवात करावी, असा हवामान पूर्वानुमानावर आधारित कृषी सल्ला मुळदे येथील फळ संशोधन केंद्राने दिला आहे.

कुडाळ - येत्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. यामुळे खरिपाच्या पेरणीस सुरुवात करावी, असा हवामान पूर्वानुमानावर आधारित कृषी सल्ला मुळदे येथील फळ संशोधन केंद्राने दिला आहे.

हवामान पूर्वानुमानावर आधारित कृषी सल्ल्यात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात मध्यम पाऊस झाला. आगामी काळात मात्र मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३० ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग ४ ते २३ किलोमीटर प्रतितास या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे खरीप पिकाच्या पेरणीला सुरुवात करावी. भातासाटी रोपवाटिका तयार करायच्या क्षेत्रामधून प्रतिगुंठा एक किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपरफॉस्फेट व चांगले कुजलेले शेणखत द्यावे. बियाण्यास प्रतिकिलो दोन ग्रॅम याप्रमाणे थायरम किंवा इनिसान हे औषध चोळावे. भातरोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणाकरीता पेरणीनंतर वाफे ओले होताच पाच ते सहा दिवसापर्यंत ब्युटॅक्‍लोर ५० टक्के क्रियाशील घटक हे तणनाशक ६० मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून वाफ्यावर फवारावे.

आंबा पिकासाठी आवश्‍यक सेंद्रीय व रासायनिक खतांचे नियोजन करुन त्याची उपलब्धता करुन ठेवावी. आंबा बागामधील फळ काढणी पूर्ण झाल्यास तेथील बांडगुळे व वाकलेल्या फांद्या काढाव्यात. त्या ठिकाणी १ टक्का बोर्डोमिश्रण लावून बाग स्वच्छ ठेवावी. आंब्याला नवीन पालवी आल्यास तेथी तुडतुडे,शेंडा पोखरणारी अळी, पाने पोखरणारी अळी, मिजमाशी यापासून आवश्‍यकतेनुसार संरक्षण करावे. आंब्यावर करपाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी बुरशीनाशक फवारणी करावी. काजू झाडावर रोठा किडीच्या नियंत्रणासाठी उपाय योजावे. नारळावरील गेंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी आवश्‍यक उपाययोजना आखाव्यात.

Web Title: kudal news konkan news monsoon