कुंभार समाजाला हवे "एनटी'मध्ये आरक्षण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - कुंभार समाजाला भटक्‍या जमातीत (एनटी) मध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी संतगोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्गनगरी - कुंभार समाजाला भटक्‍या जमातीत (एनटी) मध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी संतगोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने अध्यक्ष गणपत शिरोडकर, उपाध्यक्ष विलास गुडेकर यांच्यासह कुंभार समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून विविध वस्तू तयार करणे हा आहे. हा व्यवसाय करण्यासाठी लागणारी योग्य प्रकारची माती व पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी स्थलांतरीत होवून हा व्यवसाय करावा लागतो. कुंभारांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागत असल्याने समाजातील मुले शिक्षणापासून वंचित रहात आहेत. यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. कुंभार समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी कुंभार समाजाला भटक्‍या जमातीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी कुंभार समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी राजेंद्र हरमलकर, जयदीप वावळीये आदी उपस्थित होते.

Web Title: Kumbhar community wants reservation in NT