लोकसभा, विधानसभेच्‍या जागा कुंभार समाजास हव्‍यात

लोकसभा, विधानसभेच्‍या जागा कुंभार समाजास हव्‍यात

चिपळूण - महाराष्ट्रात कुंभार समाजाची लोकसंख्या ८० लाखांच्या घरात आहे. त्यातील ४५ लाख मतदार आहेत. जो राजकीय पक्ष १ लोकसभा व ५ विधानसभेच्या जागा कुंभार समाजाला देईल, त्यांच्यासोबत समाजबांधव राहतील.

राज्यातील १२२ मतदारसंघात समाजाचे प्रतिनिधी निवडून आले नाही, तरी राजकीय पुढाऱ्यांची गणिते हा समाज बिघडवू शकतो, असा निर्वाणीचा इशारा सर्वच राजकीय पक्षांना कुंभार समाजाच्या जिल्हा मेळाव्यात देण्यात आला.

शहरालगतच्या खेर्डी येथील एमआयडीसीच्या मैदानात कुंभार समाजाचा जिल्हा मेळावा झाला. मेळाव्यास जिल्ह्यातील सुमारे ८ ते १० हजार समाजबांधवांनी हजेरी लावली होती. सकाळी श्री दत्त मंदिर ते मेळाव्या ठिकाणपर्यंत दिंडी काढली. समाजाच्या विविध कलांचे प्रदर्शन, ‘मी कुंभार, जय कुंभार’चा नारा देत तरुणाईसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या निमित्ताने समाजातील गुणवंताचा गौरव केला. महराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते म्हणाले, येत्या निवडणुकीत जो समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल, त्याच्यापाठी आम्ही राहू. समाजातील १३ पोटजाती संघटित झाल्या. सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या ७० वर्षात समाजाचा वापर केला. समाजासाठी सरकारने काहीच दिले नाही. आमदार, खासदार झाल्याशिवाय समाजास प्रतिष्ठा मिळणार नाही. समाज जागृत झाल्याची नोंद राजकीय पुढाऱ्यांनी घ्यावी. महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश हिरे, जिल्हाध्यक्ष सुभाष गुढेकर, महिला अध्यक्षा रसिका खेडेकर, कार्याध्यक्ष सतीश पाषाणकर, महेश सायकर, दिनकर छत्तीसकर, प्रिया झोरे, सुधीर चांदेकर आदींनी मार्गदर्शन केले. सरचिटणीस प्रकाश साळवी यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com