कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य पूजा परुळेकरांची आत्महत्या

कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य पूजा परुळेकरांची आत्महत्या

मालवण - कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा प्रसाद परुळेकर (वय ३२) यांनी काल रात्री उशिरा राहत्या घरातील खोलीत पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतची खबर दीर अवधूत परुळेकर यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. 

कुंभारमाठ येथे वास्तव्यास असलेल्या सौ. परुळेकर या कुंभारमाठ ग्रामपंचायतीमधून स्वाभिमानच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आज सकाळी ६.४० वाजण्याच्या दरम्यान त्यांची जाऊ यांना पूजा यांनी घरातील पंख्यास ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच घरातील अन्य मंडळींनी त्या खोलीकडे धाव घेतली. गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून कुटुंबीयांना  धक्का बसला. हे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थांनी परुळेकर यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. 

घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिस कर्मचारी सुभाष शिवगण, डी. व्ही. जानकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रसाद परुळेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे सासरे, पती, मुली, दीर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com