अबब ! तब्बल 16 फूट उंच लाल माट 

अजय सावंत
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कुडाळ - येथील पंचायत समिती सभापती राजन जाधव यांच्या पावशी येथील छोट्याशा परसबागेत त्यांनी 16 फूट लाल भाजीच रोपट वाढले आहे. एवढ्या उंचीचे रोपटे हा नैसर्गिकदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे. निश्‍चितच या रोपट्याची लिम्का गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई व उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी व्यक्त केली. 

कुडाळ - येथील पंचायत समिती सभापती राजन जाधव यांच्या पावशी येथील छोट्याशा परसबागेत त्यांनी 16 फूट लाल भाजीच रोपट वाढले आहे. एवढ्या उंचीचे रोपटे हा नैसर्गिकदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे. निश्‍चितच या रोपट्याची लिम्का गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई व उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी व्यक्त केली. 

सभापती जाधव यांनी पावशी येथील निवासस्थानी छोट्याशा परसबागेत जूनमध्ये लाल भाजीचे बी पेरलं होतं. तब्बल तीन महिन्यांनी या लालभाजीचे रोपटे तब्बल मुळापासून सोळा फूट उंच झाले. आज या रोपट्याची पाहणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, डॉ. हळदवणेकर, कृषी विभागाचे प्रफुल वालावलकर, बाळकृष्ण परब, श्री. पोटफोडे, महेश शेडगे यांनी केली. यावेळी सौ. रितिशा जाधव उपस्थित होत्या.

श्री. जाधव म्हणाले, ""याठिकाणी जूनमध्ये लाल भाजीचे बी पेरण्यात आले. तीन महिन्यानंतर या रोपट्याची 16 फूट मुळापासून उंची वाढली आहे. सुरुवातीला शेणखताचा वापर, त्यानंतर सेंद्रिय खताचा वापर करून हे रोपटे वाढले आहे. यामध्ये सर्वांत जास्त श्रेय पत्नी रितिशा यांना जाते.'' 

रणजित देसाई म्हणाले, ""आपल्या कोकण भागात एवढ्या उंचीचे भाजीचे रोपटे वाढत नाही. या रोपट्याची वाढ करताना त्याची जोपासना केली जाते. ही जोपासना घरातील एका कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे या घरातील व्यक्तीने रोपट्याची केलेली जोपासना निश्‍चितच कौतुकास्पद आहे. यापूर्वी जिल्ह्यात इतर झाडांची उंची वाढलेली होती. त्यावेळीही काही जणांनी झाडांची लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी वाटचाल केली होती. तशाच प्रकारे श्री. जाधव यांनी वाढलेल्या रोपट्याची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यासाठी वाटचाल करावी.'' 

पोषक वातावरणाचा फायदा 
डॉ. हळदवणेकर म्हणाले, ""माटामध्ये तीन प्रकार येतात. एक हिरवा, दुसरा लाल व तिसरा राजगीर. या रोपाचा विचार केला जास्तीत जास्त चार फुटापर्यंत वाढते. 16 फूट नाही. मात्र, या रोपाच्या खोडाचा विस्तार तीन ते चार सेंटीमीटर आहे. रोपाचे वैशिष्ट्य म्हणजे बीमध्ये 16 फूटपर्यंत वाढण्याची क्षमता असेल आणि सभोवताली मिळालेले पोषक वातावरण या दोघांच्या समतोलामुळे ते वाढले असेल. झाडाची कदाचित जनुकीय रचना असेल. प्रत्यक्ष पुढील हंगामामध्ये एकूणच या बीचा वापर करण्यासाठी अन्य ठिकाणीही किती उपयुक्त ठरेल, यासाठी प्रात्यक्षिक करावे लागेल. हा प्रयोग केल्यानंतर तर ते रोप 8 ते 9 फूट वाढत असेल तर निश्‍चितच तो जनुकीय प्रयोग यशस्वी म्हणता येईल. या रोपाची लिम्काबुकमध्ये नोंद शक्‍य आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lal Math having 16 feet height special story