जमिन दलाल लक्ष्मण निंबाळकर कुटूंबीयांसह चार तालुक्यातून हद्दपार 

सुनील पाटकर
मंगळवार, 15 मे 2018

महाड (रायगड) : जमीन खरेदी विक्रीमध्ये फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल असलेले महाड येथील लक्ष्मण तुकाराम निंबाळकर यांना पत्नी,मुलगा व पुतण्यासह चार तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी हि कारवाई केल्यीची माहिती दिली आहे. हद्दपारीच्या कालावधीत ते या क्षेत्रात दिसून आल्यास त्यांच्या विरूध्द मुंबई पोलिस कायद्या प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1955 चे कलम 55 अन्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांच्याकडील हद्दपार प्रस्तावावर कारवाई करताना हा निर्णय जारी करण्यात आला. त्या निर्णया प्रमाणे निंबाळकर कुटूंबीयांना प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीकरिता  माणगांव, महाड, पोलादपूर, खेड या तालुक्यांतून हद्दपार करण्यात आलेले आहे.

महाड तालुक्यामधील मांडले गावचे मूळ रहिवासी तसेच सध्या महाड शहरातील काकरतळे येथे राहत असलेले लक्ष्मण तुकाराम निंबाळकर याच्यासह पत्नी लतिका लक्ष्मण निंबाळकर, पुतण्या अमोल रामदास निंबाळकर आणि मुलगा शंतनू लक्ष्मण निंबाळकर या चौघांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध जमीन फसवणूक व गर्दी मारामारीचे गुन्हे नोंद आहेत.  

हे गुन्हेगार हद्दपार क्षेत्रात अढळून आल्यास महाड शहर पोलीस ठाणे  02145 -222149. महाड तालुका पोलीस ठाणे - 0214-222254 पोलादपूर पोलीस ठाणे 02191-240033 खेड पोलीस ठाणे  02356-262333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Land brokar laxman nimbalkar including his family exile from four district