करूळ घाट खचला; भुईबावड्यातही दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत 

Land Slice Incidence In Karul And Bhibawada Ghat Sindhudurg
Land Slice Incidence In Karul And Bhibawada Ghat Sindhudurg

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे करूळ घाटरस्ता खचला. भुईबावडा घाटातही दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही घाटातील वाहतुक विस्कळीत झाली आहे. करूळ घाटातुन एकेरी वाहतुक सुरू आहे. भुईबावडा घाटातील दरड हटवुन दुपारनंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली. 

तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अक्षरक्षः झोडपुन काढले आहे. सतत पडणाऱ्या पावसाचा फटका करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटरस्त्यांना बसला. अतिवृष्टीमुळे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही माहीती मिळाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील दगड बाजुला करीत दुपारनंतर वाहतुक सुरळीत केली. 

सायंकाळी उशिरा करूळ घाटरस्ता खचला. रस्त्याचा निम्मा भाग खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक काही काळ बंद करण्यात आली होती. त्यानंतर बॅरेल उभी करून करूळ घाटातुन एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. करूळ घाटरस्ता खचल्याची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस नाईक विलास राठोड आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्याची पाहणी करून बांधकाम कर्मचाऱ्यांकडुन बॅरेल उभी करून घेतली. 

नावळे येथे गाय वाहुन गेली 
संततधारेमुळे तालुक्‍यातील सर्वच नद्यांना पुर आला आहे. नावळे येथील अंकुश रामचंद्र घाडी या शेतकऱ्यांची गाय नागझरी नदीला आलेल्या पुरातुन वाहुन त्यांचे 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com