दरडी बरोबर आपत्ती व्यवस्थापनही कोसळले

landslide
landslide

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली येथे आज कोसळलेल्या दरडी नंतर आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले.चौविस तास सुरु असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षात क्रमचारी गैरहजर असल्यापासून वाहतूक व्यवस्था पर्यायी मार्गे वळलण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्थापनातील अनेक त्रुटी या घटनेने समोर आल्या आहेत.

कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करत असतो परंतु असे आराखडे कागदावरच असल्याचे वृत्त सकाळने प्रसिध्द केले होते. त्याचा प्रत्यय या घ़टनेत आला आहे.आपत्ती घडल्यानंतर तातडीने नियंत्रण कक्षात कळविण्याची पहिली व्यवस्थाच हा घटनेत कोलमडली महसुल नियंत्रण कक्षात नेमणूक असलेले दोन कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती पुढे आली आहे.घटनेला तातडीने प्रतिसाद देणे ही पुढची पायरीही तशीच राहिली. घटने नंतर एक तासाने ही यंत्रणा आल्याने वाहतूक कोंडी झाली.वाहतूक पोलिस तपासणी नाक्यापासुन काही अंतरावर हे ठिकाण असुनही घटनेची माहिती व वाहतूकीवर नियंत्रण पूर्णपणे फसले.

वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात न आल्याने महामार्गावर लांब रांगा लागल्या.दरड कोसळलेल्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामासाठी डोंगर खोदकाम केलेले आहे.ज्या ठिकाणी दरडी येण्याची संभाव्यता आहे त्या ठिकाणी यंत्रसामुग्री ठेवणे गरजेचे होते.आपत्तापूर्वी येथे दरड कोसळण्याची शक्यता प्रसार माध्यमे व महामार्ग पोलिसांनी संबंधीत विभागाला कळवली होती तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.महामार्ग विभागाचा साधा नियंत्रण कक्षही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्ग पोलिसांचे मदत केंद्र क्रमांकही योग्य ठिकाणी दर्शवलेले नसल्याने व क्रमांक वारंवार बदलत असल्याने प्रवाशांना संपर्क करणे कठिण झाले.चार तासाने दरड हटवून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली.पर्यायी वाहतूक व्यवस्था वेळेत दिली न गेल्याने वाहनचालक व प्रवाशांना चार तास गाडीत काढाले लागले.या घटनेत कोणताही हानी जरी झाली नसली तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत.

या घटनेनंतर घडलेल्या त्रुटी दुर केल्या जातील व आपत्ती व्यवस्थापन कामात कामचुकारपणा दाखवणा-या कर्मचा-यांना कारवाईच्या नोटिस बजावल्या जातील.
- विठ्ठल इनामदार ( प्रांताधिकारी,महाड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com