Lanja Mumbai Goa Highway accident
esakal
लांजा (रत्नागिरी) : भरधाव जाणाऱ्या मोटारीने महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. यामध्ये मोटारीचा चुराडा (Ratnagiri fatal car accident news) झाला. हा अपघात काल सकाळी सातच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शांतिनगर येथे झाला.