लक्ष्मीकांत लिंगायतला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

दाभोळ - इंदापूर (जि. पुणे) येथे द गोल्डन पिरॅमिड पिक्‍चर्स व ग्रीनवूड क्रिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लघुपट महोत्सवात दापोलीचा सुपुत्र लक्ष्मीकांत लिंगायत याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मीकांतने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय लघुपट महोत्सवात महाराष्ट्र, गुजराथ, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, ओरिसा आणि दिल्ली आदी राज्यांमधून १६१ लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील ३५ लघुपटांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली.

दाभोळ - इंदापूर (जि. पुणे) येथे द गोल्डन पिरॅमिड पिक्‍चर्स व ग्रीनवूड क्रिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लघुपट महोत्सवात दापोलीचा सुपुत्र लक्ष्मीकांत लिंगायत याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मीकांतने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय लघुपट महोत्सवात महाराष्ट्र, गुजराथ, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, ओरिसा आणि दिल्ली आदी राज्यांमधून १६१ लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील ३५ लघुपटांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. यामध्ये सहभाग असलेल्या ‘भटक्‍या’ या लघुपटाची निर्मिती मृणालिनी कुलकर्णी यांनी केली असून स्वप्नील नांदिवडेकर यांचे दिग्दर्शन आहे. अनाथ मुलाची कथा असलेल्या या लघुपटात सहावीत शिकणाऱ्या लक्ष्मीकांतने प्रमुख भूमिका साकारली आहे. लघुपटाचे चित्रीकरण दापोली तालुक्‍यातील भोपण, नानटे व दापोली शहरातील काळकाई कोंड येथे झाले. हा लघुपट ११ मार्चला प्रभादेवी (मुंबई) येथील रवींद्र नाटयमंदिरमध्ये मराठी लघुपट महोत्सवात प्रदर्शित होणार आहे. 

‘तोलक’मध्ये मिळणार लक्ष्मीकांतला भूमिका
लक्ष्मीकांतचा अभिनय पाहून भारावलेल्या ‘तोलक’ या लघुपटाचे दिग्दर्शक नवनाथ ढमे यांनी त्याला त्यांच्या आगामी लघुपटात भूमिका देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Web Title: laxmikant lingayat best child artiste award