'ही तर कोकणी शेतकऱ्यांची चेष्टा ; ठाकरे सरकार काय मदत देणार' ? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

सरकारला कोकणातील शेतकऱ्यांबद्दल काहीही देणेघेणे नाही

लांजा (रत्नागिरी) :  भातशेतीला गुंठ्यामागे जेथे 5 हजार खर्च येतो तेथे गुंठ्यामागे 100 रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्याना मिळणार आहे. सरकारने त्यांची एकप्रकारे चेष्टा चालविली आहे. भातपिकाच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 10 हजार म्हणजे गुंठ्यामागे 100 रूपये देवून ठाकरे सरकार काय मदत देणार आहे ? या सरकारला कोकणातील शेतकऱ्यांबद्दल काहीही देणेघेणे नाही, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. 

शनिवारी (ता. 24) कोकण दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झालेल्या लांजा तालुक्‍यातील कुवे आणि पन्हळे या दोन गावांतील शेतकऱ्यांची थेट बांधावर जावून भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, उल्का विश्वासराव आदी उपस्थित होते. 

हेही वाचा- आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल -

या दौऱ्यात प्रवीण दरेकर यांनी सुरूवातीला कुवे आणि त्यानंतर पन्हळे गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. अनेक अडचणी, पीक कर्ज, राष्ट्रीय बॅंकांकडून होणार त्रास, महावितरण यांचयाकडून होणाऱ्या अडचणी मांडल्या. 
यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे आहे. जिथे गुंठ्यामागे 5 हजार खर्च येतो त्या गुंठ्यामागे 100 रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्याना मिळणार आहे. सरकारने त्यांची एकप्रकारे चेष्टा चालविली असून त्यांना कोकणातील शेतकऱ्यांबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे दरेकर म्हणाले 

हेही वाचा-दोन तासांच्या थरारानतंर दोनशे फुट खोल दरीतुन श्रीकांतला बाहेर काढण्यात आले यश -

सरसकट नुकसानभरपाईसाठी प्रयत्न 
जनतेच्या प्रश्नासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असुन सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले शेतकऱ्याना दिले. भातपिकाच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 10 हजार म्हणजे गुंठ्यामागे 100 रूपये देवून ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालविली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सरकार संवेदनशील नाही, असा आरोप दरेकर यांनी केला. 

एक नजर ( चौकट पट्टीत वापरणे) 
* गुंठ्यामागे 5 हजार खर्च येतो 
* भरपाई गुंठ्यामागे 100 रूपये 
* कोकणाबाबत असंवेदनशीलता 
* सरसकट भरपाईची मागणी 

संपादन - अर्चना  बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar comments for Thackeray government