

Students participating in the ‘Play Period’ activity to understand menstrual health through play in Ratnagiri schools.
Sakal
रत्नागिरी : मासिक पाळीविषयी असलेला संकोच, भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी कविता सावंत आणि दिव्या सुब्रमण्यम या दोघींनी एक अनोखा मार्ग निवडला आहे. त्यांनी ‘प्ले पिरीयड’ (Play Period) हा बोर्ड गेम तयार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थिनींना मासिक पाळीमागचे विज्ञान सोप्या आणि खेळकर पद्धतीने समजावून सांगितले जात आहे.