रात्रीस खेळ चाले ; नऊ व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर

In-legal sand mills in Maldoli area kokan marathi news
In-legal sand mills in Maldoli area kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : गोवळकोटमधील नऊ मोठ्या वाळू व्यावसायिकांनी मालदोली परिसरात अनधिकृत वाळू उपसा सुरू केला आहे. दहा दिवसांत त्यांनी दोन लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळवल्याची चर्चा आहे. गोवळकोट परिसरात फायबरच्या बोटीने अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. दहा ते बारा बोटी रात्री खाडीत पाठविल्या जातात. एका रात्री २५ ब्रास वाळू काढली जाते. गोवळकोट येथील शासकीय जागेवर ती साठवली जाते.

तेथून पहाटे वाळूची वाहतूक केली जाते. शासकीय जागेचा वाळू साठविण्यासाठी उपयोग होऊ नये, म्हणून शासकीय जागेच्या परिसरात चर मारण्यात आली आहे. मात्र, एक गाडी जाईल एवढी जागा सोडण्यात आली आहे. त्याचा उपयोग वाळू व्यावसायिक करीत आहेत. पाच ते सहा हजार रुपये ब्रास दराने वाळूची विक्री सुरू आहे. पोलिस व महसूलचे अधिकारी गोवळकोटमध्ये तपासणी करण्यासाठी जातात. त्याची माहिती वाळू व्यावसायिकांना अगोदरच मिळते. अधिकारी बंदरावर येण्यापूर्वी वाळूची विल्हेवाट लावली जाते. 

दहा दिवसात  २ लाख ८० हजारांची कमाई
गोवळकोट खाडीत लोखंडी होडीने वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांनी मालदोली व चिवेलीतील खाडीत वाळू उपसा सुरू केला आहे. ९ व्यावसायिक एकत्र येवून वाळू उपसा करीत आहेत. मालदोली येथील स्मशानभूमीच्या परिसरात वाळू उतरवली जाते. तेथून वाळूची वाहतूक केली जाते. मालदोलीमध्ये वाळू उपसा सुरू आहे, हे कोणाच्याही लक्षात येवू नये, म्हणून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता दिवसा झुडपे टाकून बंद केला जातो. शासनाची रॉयल्टी न भरता वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे दहा दिवसात तब्बल २ लाख ८० हजार रुपयाचा निव्वळ नफा या व्यावसायिकांनी कमविल्याची चर्चा आहे.

दबावाला बळी न पडता कारवाई

चिपळूण तालुक्‍यात कुठेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी महसूल विभागाला त्याची माहिती द्यावी. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नसेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली जाईल.
- तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com