बिबट्याने पोल्ट्री फार्ममध्ये केली 500 कोंबड्यांची 'शिकार'; मालकाची भीतीने बोबडी वळली

leopard attack on poultry house 500 when finished in lanja ratnagiri
leopard attack on poultry house 500 when finished in lanja ratnagiri
Updated on

लांजा (रत्नागिरी) : रात्री दोन बछड्यांसह मादी बिबट्याने पोल्ट्री फार्मवर हल्लाबोल करून 500 गावठी व गावरान कोंबड्या फस्त केल्याची घटना लांजा तालुक्‍यातील खावडी कोतवडेकरवाडी येथे घडली आहे. या घटनेत पोल्ट्री मालकांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा तालुक्‍यातील खावडी कोतवडेकरवाडी या ठिकाणी खावडी एसटी स्टॉपनजीक सखाराम सीताराम कोतवडेकर, संदेश सखाराम कोतवडेकर, मंगेश सखाराम कोतवडेकर व सुरेश सखाराम कोतवडेकर यांनी पाच महिन्यांपूर्वी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पोल्ट्री व्यवसायासाठी त्यांनी पत्र्याची शेड मारली आहे; मात्र दोन्ही बाजूने आवश्‍यक त्या प्रमाणात भिंत नसून एका बाजूने ग्रीन नेटची जाळी मारली होती.

या पोल्ट्री फार्ममध्ये गावरान आणि गावठी कोंबडी पाळल्या होत्या. या ठिकाणी आठ महिन्यांची व दोन ते अडीच किलो वजनाचे 500 पक्षी होते. दरम्यान, बिबट्याने पोल्ट्रीफार्मवर हल्ला केल्याची ही तालुक्‍यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते. बिबट्याचा हल्ला आणि मुक्त संचार यामुळे खावडी जमा गावांमध्ये दावडी गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भीतीने बोबडी वळली अन्‌ घराकडे धूम.. 

रात्री 11.30 च्या सुमारास बिबट्याने आपल्या दोन बछड्यांसह या पोल्ट्री फार्मवर हल्ला केला. ग्रीन नेट फाडून बिबट्याने पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश केला. या वेळी आतमध्ये सखाराम कोतवडेकर, मंगेश कोतवडेकर व सुरेश कोतवडेकर होते. ग्रीन नेट कोण फाडत आहे, हे पाहण्यासाठी ते जवळ गेले असता, मादी बिबट्या व दोन बछड्यांना पाहून त्यांची भीतीने बोबडी वळली. त्यानंतर या तिघांनी पुढील दरवाजाने घराकडे धूम ठोकली. ते घरून पुन्हा येईपर्यंत मादी बिबट्या आणि दोन बछडे यांनी केलेल्या हल्ल्यात या पोल्ट्री फार्ममधील सुमारे पाचशे गावरान व गावठी कोंबड्या मारल्या गेल्या. यातील काही कोंबड्या या तिघांनी फस्त केल्या आणि जंगलाकडे निघून गेले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com