कोकण : विरेश्‍वरच्या बेटावर भरतोय कासवांचा मेळा! तुम्ही पहिला का?

tortoise scene chiplun vireshwar lake in kokan
tortoise scene chiplun vireshwar lake in kokan

चिपळूण (रत्नागिरी) : नागरिकांना कासव पाहण्यासाठी शहराबाहेर जाण्याची गरज नाही. शहरातील विरेश्‍वर तलावात सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात कासवे दिसत आहेत. तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर कासव दर्शन घडते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. 

शहराच्या मध्यभागी असलेल्या विरेश्‍वर तलावाला मोठा इतिहास आहे. हा तलाव शिवकालीन आहे. ऐतिहासिक विरेश्‍वर मंदिराच्या शेजारीच हे तलाव आहे. ब्राह्मण सहाय्यक संघाने या ठिकाणी कवी केशवसुत यांचे स्मारकही उभे केले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना हा परिसर नेहमीच भुरळ घालतो. त्यात आता कासवांचीही भर पडली आहे.

पूर्वी विरेश्‍वर तलाव दुर्लक्षित होता. येथील सामाजिक कार्यकर्ते महेश दीक्षित यांनी पुढाकार घेऊन विरेश्‍वर मित्रमंडळाची स्थापना केली आणि विरेश्‍वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी चळवळ राबवली. नगरपालिका तसेच राज्य सभेतील सदस्यांचा निधी आणून तलावाचे नूतनीकरण करण्यात आले. तलावाच्या परिसरात दोन मोठ्या विहिरी आणि शिवकालीन पायऱ्याही सापडल्या होत्या.

नूतनीकरण झालेल्या या तलावाच्या परिसरात वॉकसाठी नागरिकांची पहाटे आणि सांयकाळी गर्दी होते. दिवसभर कॉलेजचे विद्यार्थी आणि ग्रामीण भागात खासगी वाहतुकीने जाण्यासाठी येणारे नागरिक विश्रांतीसाठी तलावावर येतात. तलावाच्या मध्यभागी बेट तयार करण्यात आले आहे. त्या बेटावर ही कासवे दुपारी बसलेली असतात. त्यांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची गर्दी होते. 

मासे मारत नाहीत, कमळाची फुले तोडण्यास बंदी 

या तलावात कमळे उगवतात. गोड्या पाण्यातील मासे आहेत. हे मासे मारले जात नाहीत. दूषित पाणीही तलावात सोडले जात नाही. कमळाची फुले काढण्यासही बंदी आहे. तलावाचे पावित्र्य राखण्यासाठी महेश दीक्षित यांनी पुढाकार घेतल्यामुळे नैसर्गिक जलचर येथे पाहायला मिळतात. तलावात मोठ्या प्रमाणावर कासवे आहेत. 

"तलावात पूर्वी कासवांची संख्या कमी होती. काही वर्षापूर्वी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहबरोबर वाहून आलेली दोन कासवे मला मिळाली. ती मी तलावात सोडली. पालिकेकडून तलावाची स्वच्छता केली जाते. आम्ही लोकसहभागातूनही तलाव स्वच्छ करतो. तलावातील नैसर्गिक संपदा वाढवण्यासाठी यापुढेही प्रयत्न केले जातील."

- महेश दीक्षित, अध्यक्ष विरेश्‍वर मित्र मंडळ

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com