त्या महिलेने बिबट्याच्या हल्लात केला असा प्रतीकार अन्......

Leopard attacks for women in ratnagiri
Leopard attacks for women in ratnagiri

रत्नागिरी :  तालुक्यातील निवळी-शेल्टीवाडी येथे भर दुपारी जखमी बिबट्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. महिलेने बिबट्याच्या तावडीतून स्वतः ची कशीबशी सुटका करून घेतली. हल्ल्यानंतर बिबट्या तेथीलच एका झाडावर जाऊन बसला. या झाडाच्या बाजूला काम करणारे कामगार जीव मुठीत धरून दबा धरून बसले आहेत.

हल्लेखोर बिबट्या जखमी असल्याचे देखील बोलले जात आहे. आज दुपारी या बिबट्याने गावातील गुरव नामक महिलेवर हल्ला केला. ही महिला कामानिमित्त या ठिकाणी गेली होती. जखमी अवस्थेतील बिबट्याने या महिलेवर हल्ला करत तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यात महिलेच्या चेहर्‍याला गंभीर जखमा झाल्या आहेत. स्वतः चा जीव वाचवत महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर बिबट्या नजीकच्या झाडावर चढून बसला आहे. या झाडानजिक एक कामगार अडकून पडला असून बिबट्या पासून स्वतः चा बचाव करण्यासाठी हा कामगार तेथे लपून बसला आहे. बिबट्या गावात आल्याची खबर वन विभागाच्या कर्मचार्‍यांना देण्यात आली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी रवाना झाले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com