सिंधुदुर्गातील कवठणीत बिबट्या अडकला फासकीत

सिंधुदुर्गातील कवठणीत बिबट्या अडकला फासकीत

सावंतवाडी - सातार्डा, कवठणी भागात बिबट्या फासकीत अडकल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. रस्त्याच्या बाजूलाच ही घटना घडल्यामुळे त्याला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. उशिरापर्यंत त्याला सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते.

बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती मिळताच वनविभाग, तसेच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. उशिरापर्यंत त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी सापळा आणण्यात आला; मात्र उशिरापर्यंत बिबट्याला सोडवून सापळ्यात अडकवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. याला सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश कवठणकर यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘आताच हा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.’’ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनीही स्पष्ट केले.

तळकटमध्ये वाघाचे दर्शन
कोलझर - तळकट शाळा क्रमांक एक येथे आज दुपारी चारच्या दरम्यान वाघ दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तेथील वासुदेव राऊळ रस्त्यावरून जात असताना वाघ त्यांच्यासमोरून गेला. तो ग्रामपंचायतीकडील रोहित्राजवळ थांबला. यावेळी पोस्टमन गवस, न्हानू राऊळ आदी तेथे होते. त्याला वस्तीपासून दूर पळवण्यासाठी फटाके लावण्यात आले. हा वाघ की बिबट्या, याबाबत प्रश्‍न आहे. याआधी परिसरात वाघाचे अस्तित्व होते. आज दिसलेला वाघच असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com