दहा शेळ्या मारल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोन वासरांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे पुढे आले आहे.

राजापूर (रत्नागिरी) : जंगल परिसरासह लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे लोकांसह शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोठ्यामध्ये घुसून पाळीव जनावरांवर बिबट्याकडून होणार्‍या या हल्ल्यामुळे अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करणार्‍या या बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांसह शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी बिबट्याने पाळीवर जनावरांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशातच काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागातील करक येथे एका शेतकर्‍याच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने दहा शेळ्या मारल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना काल (ता.20) रात्री 1.30 वा. च्या सुमारास ताम्हाने पहिलीवाडी येथील अशोक अनंत चव्हाण यांच्या गोठ्यात घुसून त्या ठिकाणी बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये दोन वासरे जखमी झाली असून ती अत्यावस्थ असल्याची माहिती वनरक्षक गोसावी यांनी दिली. 

हेही वाचा- शतकोत्तर प्रवासाचा साक्षीदार पाळणा! दिग्गजांसह शंभरावर बाळांचे बारशे -

 काही दिवसांपूर्वी तालुक्यातील करक येथे बिबट्याने गोठ्यात घुसून दहा शेळ्या मारल्याची घटना ताजी असतानाच काल (ता.20) मध्यरात्री ताम्हाने येथे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही वासरे गंभीररीत्या जखमी असून ती अत्यावस्थ  स्थितीमध्ये असल्याची माहिती राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी यांनी दिली. मानवी वस्तीतील बिनधास्त वावरासह बिबट्याकडून वारंवार होणार्‍या या हल्ल्यामुळे लोकांसह शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकारी, कर्मताऱ्यांनी ताम्हाणे गावाला भेट देवून घटनेचा रितसर पंचनामा केला आहे. तर, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमी वासरांवर उपचार सुरू केले आहेत. 

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lepopard case in ratnagiri