रत्नागिरीः वाटूळमधील घरावर वीज पडल्याने भिंतीला तडे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरावर वीज पडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्‍यात 24.87 मि.मी. पाऊस पडला असून आजपर्यंत तालुक्‍यात 4743.30 मि.मी. पाऊस झाला.

राजापूर ( रत्नागिरी) - तालुक्‍यातील वाटूळ-गौळवाडी येथील गणपत लक्ष्मण धावडे यांच्या घरावर  मंगळवारी (ता. 13) सायंकाळी वीज पडली. घराच्या भिंतीला तडे गेले असून वायरिंग जळून खाक झाले आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरावर वीज पडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्‍यात 24.87 मि.मी. पाऊस पडला असून आजपर्यंत तालुक्‍यात 4743.30 मि.मी. पाऊस झाला. मंगळवारी दुपारनंतर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामध्ये सायंकाळी वाटूळ-गौळवाडी येथील गणपत लक्ष्मण धावडे यांच्या घरावर वीज पडली. त्यामध्ये घराच्या भिंतीला तडे गेले आणि घरातील वायरिंग आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू जळून खाक झाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning Strikes House In Vatul Cracking Wall Ratnagiri Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: