लिंगेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार २० पासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कणकवली - कलमठ गावडेवाडीचे जागृत देवस्थान श्री देव लिंगेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा २० ते २३ मे कालावधीत होत आहे. चार दिवस चालणाऱ्या जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यास विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जीर्णोद्वाराचा मुख्य सोहळा दिनांक २२ मे रोजी सकाळी ९.४५ वाजता कलशपूजन मठाधिपती पं. पु. धोडीबुवा शिंदे (कसाल) यांच्या हस्ते व उद्‌घाटक ठेकेदार मुरलीधर नाईक यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी (ता. २०) सायंकाळी ४ वाजता तरंदळे फाटा ते श्री देव लिंगेश्‍वर मंदिरापर्यत कलश व मुर्तीची सवाद्य मिरवणुक, रात्री १० वाजता श्री गणेश दशावतार नाट्यमंडळ कडावल यांचे दशावतारी नाटक, रविवारी (ता. २१) फनी गेम्स व रात्रौ जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. २२) मुर्ती स्थापना, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण व इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 

दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन, किर्तन, रात्रो १० वाजता ‘सोकाजीराव टांगमारे’ हा विनोदी नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार (ता. २३) सत्यनारायण पुजेचे आयोजन केले आहे. 

रात्रो १० वाजता भजनी बुवा संदीप लोके (लिंगडाळ) व विनोद चव्हाण (वर्दे-भरणी) यांच्यात ट्‌वेंटी - ट्‌वेटी डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. श्री देव लिंगेश्‍वराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने (ता. २१) मोफत महाआरोग्य व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराततज्‍ज्ञ डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Web Title: lingeshwar temple development after 20th may