सिंधुदुर्गातील ग्रामीण पशुधनात होतेय घट

सिंधुदुर्गातील ग्रामीण पशुधनात होतेय घट
Summary

प्रामुख्याने बैल आणि रेड्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गायींची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) : यांत्रिक शेतीमुळे पारंपरिक बैल जोडीसह औत धरून शेती करण्याकडील कल अलीकडे कमी होऊ लागला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पशुधनात (Livestock) घट (Decrease) होताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने बैल आणि रेड्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गायींची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे. (livestock in the rural areas of sindhudurg is declining)

सिंधुदुर्गातील ग्रामीण पशुधनात होतेय घट
Tauktae: देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून

एकेकाळी साधारणतः घरोघरी दुभते जनावर होते. त्यामुळे घरचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची रेलचेल होती. त्यामुळे ग्रामीण भागात जणू गोकुळ नांदत होते. शेतकरी गुरांबरोबर रममाण होताना दिसत होते. भातशेती करताना प्रामुख्याने नांगर ओढण्यासाठी बैल किंवा रेड्याचा वापर होत असे. पावसाळ्यात सर्वत्र शेत नांगरणी करताना बैलजोडीचा वापर केला जात असल्याचे चित्र होते; मात्र यामध्ये आता यांत्रिक शेतीचा शिरकाव झाला. सहज उपलब्ध होत असल्याने तसेच वापरण्यास सुलभ शेती यंत्रणा उपलब्ध होत असल्याने शेतकरी नागंरणीसाठी यंत्राचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता शेतीमध्ये बैलजोडी ऐवजी यंत्राचा वापर होत आहे.

सिंधुदुर्गातील ग्रामीण पशुधनात होतेय घट
देवगड ठरतोय ‘हॉटस्पॉट: या गावांना झालीय लागण

शेतीचा हंगाम संपल्यावर बैल किंवा रेडा जोडी चा वर्षभर सांभाळण्याचा खर्च परवडत नाही. तसेच एकत्रित कुटुंब पद्धती लोप पावत चालल्याने अलीकडे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळला आहे. यामुळे कामे पटकन उरकण्यासह अन्य काही खर्च नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधन कमी होत आहे. जनावरे चरण्यासाठी सोडण्याच्या जागाही आता बागांनी व्यापल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे दुग्धोत्पादनात अडचणी जाणवतात. खर्चाच्या तुलनेत दुधाचे प्रमाण नसल्याने शेतकरी पारंपरिक पद्धत सोडून संकरित गायींच्या पालनाकडे वळत आहेत. तालुक्यात पशुधनात बैल आणि रेड्यांची संख्या घटली आहे. दुग्धोत्पादन जनावरे बाळगली जात आहेत. त्यामुळे दुध उत्पादन स्थिर असल्याचे सांगितले जाते.

सिंधुदुर्गातील ग्रामीण पशुधनात होतेय घट
देवगड, वैभववाडीत ऑक्‍सिजन प्लांट उभारणार : उदय सामंत

तालुक्याच्या पशुधनात घट झाली आहे; मात्र त्यात बैल आणि रेड्यांची संख्या कमी आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये ५० टक्के गायी, बैलांची पैदास होत असे. मात्र कृत्रिम रेतनामध्येही लिंग निश्‍चिती असल्याने सुमारे ९० टक्के गायी, म्हैशीची पैदास होते. त्यामुळे बैल आणि रेड्यांची संख्या आपोआपच घटली आहे.

- डॉ. व्ही. एस. ढेकणे, पशुधन विकास अधिकारी, देवगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com