esakal | देवगड, वैभववाडीत ऑक्‍सिजन प्लांट उभारणार : उदय सामंत

बोलून बातमी शोधा

देवगड, वैभववाडीत ऑक्‍सिजन प्लांट उभारणार : उदय सामंत
देवगड, वैभववाडीत ऑक्‍सिजन प्लांट उभारणार : उदय सामंत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या तसेच वाढत जाणारी मृत्यूंची संख्या लक्षात घेता देवगड आणि वैभववाडीत ऑक्‍सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. तर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करू अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. सामंत यांनी येथील कोविड लसीकरण केंद्राला आज भेट दिली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

खारेपाटण ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सात ते आठ दिवसात नवीन रुग्णवाहिका दिली जाईल. तर कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रामा केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. याखेरीज कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जसा ऑक्‍सिजन प्लांट तयार केला तसाच वैभववाडी आणि देवगड रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.पालकमंत्री उदय सामंत यांना खारेपाटण विभाग शिवसेना कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये शोधली बाजारपेठ; कडू कारल्याने शेतक-याचे आयुष्य झाले गोड

पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कटेकर, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरो ग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय लाड, सागर खंडागळे, महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री पाटील, मंडल अधिकारी मंगेश यादव, ग्रामविकास अधिकारी जी सी. वेंगुर्लेकर, खारेपाटण विभाग शिवसेना प्रमुख महेश कोळसुलकर, दया कुडतरकर, शिवाजी राऊत, वैभव कांबळे, गिरीश पाटणकर, संतोष गाठे, तेजस राऊत, प्रदीप इसवलकर तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, डॉ. पूजा ताडे आदी अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.