'स्माईल प्लीज'; लॉकडाउनमुळे हरवलं फोटोग्राफर्सचं हास्य

सलग दुसऱ्‍या वर्षी याच कालावधीमध्ये कोरोना प्रादुर्भावाने डोके वर काढले
'स्माईल प्लीज'; लॉकडाउनमुळे हरवलं फोटोग्राफर्सचं हास्य

राजापूर : फोटोग्राफर-व्हिडिओग्राफरचा वर्षभरातील हक्काचा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या ऐन लग्नसराईच्या हंगामामध्ये सलग दुसऱ्‍या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन (lockdown) जारी झाले आहे. त्यामुळे 'स्माईल प्लीज' म्हणत समोरील व्यक्तीच्या सुखद क्षणांना आपल्या कॅमेऱ्‍यात कैद करणाऱ्‍या फोटोग्राफर्सचे (photographers) 'स्माईल' लॉकडाउनमुळे हरवले आहे.

सर्वसाधारपणे दिवाळीनंतर सुरू होऊन मे महिनाअखेरपर्यंत लग्नसराईचा हंगाम सुरू असतो. या कालावधीमध्ये आयुष्यातील अनमोल क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफरर्स-व्हिडिओग्राफरना यजमानांकडून मागणी असते. त्यातून या व्यावसायिकांना हक्काचे उत्पन्न मिळते. मर्यादित कालावधीमध्ये असणाऱ्‍या या हंगामामुळे हे व्यावसायिक वर्षभरातील उत्पन्नाची तजवीज करतात. मात्र, सलग दुसऱ्‍या वर्षी याच कालावधीमध्ये कोरोना प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे.

त्यातून शासनाने लॉकडाउन जारी केले आहे. त्याचा चांगलाच फटका फोटोग्राफर व्यावसायिकांना बसला आहे. लग्नसराईच्या या सीझनमध्ये नियोजित उत्पन्नाची आशा फोटोग्राफर व्यावसायिकांना बांधली होती. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांच्या सर्व आशांवर पाणी फिरले आहे. थोड्या दिवसांनी परिस्थिती ठीक होईल, अशी आशाही त्यांना होती. मात्र, लॉकडाउनचा कालावधी अधिकच वाढतच गेला.

'स्माईल प्लीज'; लॉकडाउनमुळे हरवलं फोटोग्राफर्सचं हास्य
मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं !

बँककर्जाचे हप्ते फेडायचे कसे?

सद्यःस्थितीमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे लग्नाला प्रशासनाकडून परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे ऐन भरात येणारा फोटोग्राफीचा 'सीझन' सलग दुसऱ्‍या वर्षी त्यांच्या हातातून निसटला आहे. त्यातून, फोटोग्राफर, फोटो-व्हिडिओ अ‍ॅक्सेसरिज विक्रेते, कलर लॅब, एडिटर यांना जोरदार आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागला आहे. अशा स्थितीमध्ये दुकानाचे भाडे, नोकरदारांचे पगार, लाईट बिल यांच्यासह अन्य खर्च नेमका उभारायचा कुठून? व्यवसायवृद्धीसाठी घेतलेल्या बँककर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

लग्नसराई हंगाम हा फोटोग्राफर व्यावसायिकांचा हक्काचा उत्पन्नाचा हंगाम असतो. मात्र, कोरोनाने तो हिरावल्याने फोटोग्राफर व्यावसायिकांना सध्या आर्थिक तंगीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामध्ये झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने अन्य व्यावसायिकांना मदत देण्याचे शासनाकडून राबविण्यात येत असलेले धोरण फोटोग्राफर व्यावसायिकांच्याबाबतीतही शासनाने प्राधान्याने राबवावे.

- राजेश, फोटोग्राफर

'स्माईल प्लीज'; लॉकडाउनमुळे हरवलं फोटोग्राफर्सचं हास्य
मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा; शाहू महाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com