कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न पण त्यातुनच मिळाली जगण्याची उर्मी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

आपल्याला असेच जीवन जगावे लागेल, या भीतीपोटी शेवटच्या क्षणी असित सुतरिया यांनी निर्णय बदलून आपल्या मूळ गावी गुजरात येथे रेल्वेने गेले.

देवरूख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील रत्नागिरी-कोल्हापूर या महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ सापडलेली बेवारस दुचाकी व त्यापासून काही अंतरावर सापडलेला मोबाईल व बेपत्ता व्यावसायिक यांचे गूढ साखरपा पोलिसांनी उलगडले आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करायला गेले, पण जगण्याची इच्छा प्रबळ झाली अन्‌ दुचाकी सोडून गुजरात येथे रेल्वेने गेले.

हेही वाचा -  कमी खर्चात शेती, भिरवंडेच्या तरुणांचा आदर्श 

असित गोवर्धन सुतरिया (रा. कोल्हपूर) हे २४ सप्टेंबरला (एमएच-९-डीजे-४८६३) या दुचाकीने रत्नागिरी येथे सन्माईक मार्केटिंगसाठी गेले होते; मात्र लॉकडाउन काळात व्यवसायात आर्थिक अडचण आल्याने व व्यवसायात मंदी आल्याने आर्थिक संकट वाढल्याने व्यवसायात फारच मंदी आली. याच नैराशेतून कोल्हापूर येथे परतीच्या मार्गातून जात असताना दुचाकी व मोबाईल टाकून आत्महत्या करण्याचा विचार केला होता, मात्र त्यातून आपण जगलो तर आपल्याला मोठी दुखापत होऊन कायमचे अपंगत्व येईल. तसेच आपल्याला असेच जीवन जगावे लागेल, या भीतीपोटी शेवटच्या क्षणी असित सुतरिया यांनी निर्णय बदलून आपल्या मूळ गावी गुजरात येथे रेल्वेने गेले.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो कोकण पॅटर्न तुमच्या फायद्याचाच 

बेवारस सापडलेली दुचाकी मोबाईल व बेपत्ता व्यावसायिक याचा शोध कोल्हापूर व साखरपा पोलिसांनी घेण्यास सुरवात केली, मात्र चार दिवस झाले तरी हाती काही लागले नाही, मात्र पोलिसांनी आपला मोर्चा त्यांच्या मुलाकडे वळवला. असित सुतरिया यांनी मुलाकडे दुसऱ्या दिवशी मी सुखरूप असण्याची कल्पना दिली. ही बाब कोणाला सांगू नकोस सांगितले. अन्यथा मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेन, असे सांगितले. हाच धागा पकडून व मिळालेल्या मोबाईल नंबरवरून पोलिसांनी आपले हुकमी एक्के वापरून व्यावसायिकाशी फोनद्वारे पोहचवून सारा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते अधिक तपास करीत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown period one businessman vehicle found by police and businessman information to police in ratnagiri