सिंधुदुर्गात लॉकडाउनविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; काय सुरु, काय बंद, वाचा सविस्तर

lockdown period orders from collector rules and regulations of government
lockdown period orders from collector rules and regulations of government
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्य मंत्री मंडळ बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्य शासनाने रविवारी रात्री जाहीर केलेले कोरोना निर्बंध सिंधूदुर्ग जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. शासनाने आठवडा बाजारावर बंदी घातलेली नसल्याने जिल्ह्यात आठवडा बाजार शनिवार, रविवार वगळता सुरु राहणार आहेत. काही दिवसांनी जिल्ह्याची स्थिती पाहता बदल अपेक्षित असल्यास त्यात थोडी सूट दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने रविवारी काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 नंतर याची अंमलबजावणी केली जाईल.  हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे, तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंच दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

 जिल्ह्यात हे असेल बंद - 

  • मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. 
  • चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले,  सभागृहे, वॉटर पार्क्स, सलून्स पूर्णपणे बंद राहतील. 
  • प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद. 
  • उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद. खाद्य विक्रेत्यांसाठी  पार्सल सेवा. 
  • सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे.
  • शाळा- महाविद्यालये बंद राहतील.
  • वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद. 


जिल्ह्यात हे असेल सुरु - 

  • शेतीविषयक कामे सुरु राहतील. 
  • रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी. 
  • सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू. 
  • शासकीय कार्यालये - ५० टक्के उपस्थितीत सुरु. 
  • ई कॉमर्स सेवा सुरु. 
  • उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू.
  • वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु. 
  • आठवडा बाजार सुरु. 

अशाप्रकारचे कडक निर्बंध राज्य शासनाने जाहीर केले असून सोमवारी रात्री पासून त्याची अंमल बजावणी सुरु झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना विचारले असता, शासनाने लागू केलेले निर्बंध जसेच्या तसे जिल्ह्यात लागू करण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राजकीय कार्यक्रम पूर्णपणे बंद राहणार असून लग्न समारंभात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर बंधनकारक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा

जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. आम्ही शासनाकडे मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे. परंतु, शासन जिल्ह्याची लोकसंख्या व कोरोनाची स्थिती पाहून लस पुरवीत आहे. त्यामुळे जिल्ह्याला मागणीप्रमाणे लस उपलब्ध होत नाही. पहिली लस घेण्यासाठी विनंती करावी लागत होती. परंतु आता नागरिक लस मिळावी यासाठी पाठपुरावा करीत आहेत. जिल्ह्यात सध्या रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com