कोकणात शिक्षकांच्या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी होत आहेत कृतीशील

lockdown period the students of school prepare creative things with the help of teachers in konkan
lockdown period the students of school prepare creative things with the help of teachers in konkan

सावंतवाडी : आपल्या अंगातील विविध कलागुणांना वाव देण्याबरोबरच आपल्या उमेदीला नवचैतन्याची पालवी देण्याचे काम लॉकडाउन काळात कळसुलकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी केले आहे. निसर्गप्रेम व हस्तकौशल्यातून दाखविलेल्या कृतीतून या मुलांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

शाळा बंद असल्याने घरी असलेल्या मुलांचा ऑनलाईन अभ्यास घेत असतानाच मुलांना कृतिशील बनविण्यासाठी स्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी विविध प्रकारच्या संकल्पना राबविल्या. त्याला मुलांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. फक्त शालेय पाठ्यक्रमावर आधारित शिक्षण न देता मुलांना कृतिशील शिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर यांच्या संकल्पनेतून आणि सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्रियाशील आगळीवेगळी चालना दिली.

प्रशालेच्या गाईड शिक्षिका ज्योती पावसकर यांनी विद्यार्थ्यांना विविध फुलझाडे, औषधी वनस्पती यांची ओळख करून त्यांचे रोप आणि बिया गोळा करण्यास सांगितले तसेच आपल्या अंगणात व गॅलरीमध्ये हे लावण्याचे मार्गदर्शन केले. शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत व मुलांच्या यशाबाबत पालकांनीही समाधान व्यक्त केले. या सर्व मुलांमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनी दूर्वा बांदेकर हिने आपल्या या बागेत कोरफडची केलेली लागवड उल्लेखनीय होती.

यासोबतच मुलांनीही मिळालेल्या मार्गदर्शनातून उत्तम विणकामही केले नववी ब मधील विद्यार्थ्यांनी स्वयंपाक गृहातील वापरण्यात येणाऱ्या फळभाज्या यांच्या माध्यमातून सुंदरसे ग्रीन सलाडपासून फुलांची नक्षी तयार केली. त्यांना शिक्षिका समृद्धी सामंत यांचे मार्गदर्शन लाभले. यात गिरीजा उपाध्ये आणि मनस्वी कारेकर यांनी काकडी, गाजर यांच्या माध्यमांनी केलेली नक्षी फारच आकर्षक ठरली होती. यात संकल्पनेतून त्यांनी सुंदर कलाकृती कागदी पुष्पगुच्छ, शोपीस व इतर हस्तकलेच्या वस्तू साकारल्या आहेत. यासोबतच लॉकडाऊनच्या काळात फिजिकल फिटनेस ही फार महत्वाची जात आहे. त्यातच शाळा बंद असल्याने व्यायाम कसरती खेळ आदी गोष्टीपासून अनेक मुले दुरावले आहेत; मात्र शारीरिक आरोग्य चांगले असेल तर मानसिक आरोग्य चांगले राहते युक्तीने मुलांनी व्यायाम प्रकार, योगासने यामध्ये खंड पडु दिला नाही.

शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे आहे. भेडसावत असलेला प्रश्न आहे; मात्र यावर तोडगा म्हणून एनसीसी विभागाच्या कॅडेटनी ५८ बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल नरेश कुमार व प्रशालेचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट गोपाळ गवस यांच्या सहकार्यातून प्रात्यक्षिक सुरू ठेवले आहे. घरीच राहून भारत सरकारच्या फिट इंडिया मोव्हमेंट उपक्रमांतर्गत विविध क्रीडाप्रकार योगासने केली.

मुलांनी यासाठी दिलेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद होता. यावेळी व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून व एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेनेच्या) प्रशिक्षणासाठी बनविलेल्या ॲपचे मोफत वितरणही करण्यात आले. एकीकडे शाळा बंद असतानाही सुप्त कलागुणांना वाव देत आपले जीवनातील शिक्षण कधीही थांबू न देता सुरू ठेवले पाहिजे, असा एक प्रकारचा संदेश या मुलांनी दिला आहे. 

"विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षक, संस्थाचालक प्रयत्नशील आहेत. पूर्णवेळ घरी बसून रािहल्याने दूरदर्शन, मोबाईल, लॅपटॉप या साधनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शारीरिक क्षमता, मानसिक विरंगुळा यांच्या दूरगामी परिणामांचा विचार पालकवर्गाने करणे महत्त्वाचे ठरेल. ऑनलाईन शिक्षण व बालकांचे स्वास्थ्य यांचा ताळमेळ महत्त्वाचा आहे."

- डॉ. प्रसाद नार्वेकर, सचिव, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com