Love Affair Case : 'मोबाईल नंबर ब्लॉक’ केला म्हणून प्रेयसीला जाळण्याची धमकी; चिडलेल्या प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल..

युवतीने मोबाईल नंबर ब्लॉक (Mobile Number Block) केल्याच्या रागातून चिडलेल्या युवकाने थेट युवतीचे घर गाठले.
love Affair Breakup Case
love Affair Breakup Caseesakal
Summary

वादंग वाढल्यानंतर युवकाने खिशातून पेट्रोलची बाटली बाहेर काढली.

कणकवली : प्रेमप्रकरणात (love Affair) ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर युवतीने मोबाईल नंबर ब्लॉक (Mobile Number Block) केल्याच्या रागातून चिडलेल्या युवकाने थेट युवतीचे घर गाठले आणि पेट्रोल ओतून जाळण्याची धमकी दिली. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला तेथून हुसकावून लावले. मात्र, त्यानंतर त्याने थेट नदीपात्रात उडी मारली.

love Affair Breakup Case
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

हा प्रकार शहरात काल (शनिवार) सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडला. या प्रकरणाची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नाही. संबंधित युवती आणि शहरालगतच्या गावातील युवक यांच्यात ‘ब्रेकअप’ झाला. त्यानंतर त्या युवतीने युवकाचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यामुळे चिडलेल्या युवकाने युवतीला गाठले. युवती राहत असलेल्या घरासमोर येऊन नंबर ब्लॉक केल्याचा जाब विचारत पेट्रोल ओतून जाळण्याची धमकी दिली.

संबंधित युवक आणि युवती यांच्यात वादंग सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली. वादंग वाढल्यानंतर युवकाने खिशातून पेट्रोलची बाटली बाहेर काढली. त्यावेळी नागरिकांनी तत्परतेने बाटली काढून घेऊन त्याला तेथून हाकलून दिले. यानंतर संबंधित युवकाने त्या शहरातील नदीपात्र गाठले आणि पाण्यात उडी मारली.

love Affair Breakup Case
डोळ्यांसमोरच स्वप्नांचा चुराडा! वडिलांच्या ट्रॅक्टरला धडकून चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, सिंगार कुटुंबीयांवर आघात

काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा प्रकार पाहताच आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी तीन ते चार फूट पाण्यात असलेल्या युवकाला पाण्याबाहेर काढले आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

love Affair Breakup Case
Murugesh Nirani : काँग्रेस सरकार कधीही पडू शकतं, 50 आमदार भाजपच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, संबंधित युवती आणि तिच्या नातेवाईकांनीही त्या शहरातील पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सुमारे तासभर पोलिस ठाण्यात या प्रकरणाबाबत चर्चा सुरू होती; मात्र नंतर याबाबत आपली कोणतीही तक्रार नाही, असे सांगून युवती आणि तिचे नातेवाईक पोलिस ठाण्यातून निघून गेले आणि या प्रकरणावर अखेर पडदा पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com