डोळ्यांसमोरच स्वप्नांचा चुराडा! वडिलांच्या ट्रॅक्टरला धडकून चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, सिंगार कुटुंबीयांवर आघात

सिंगार कुटुंबीय मुलांच्या भविष्यासाठी राबत होते; पण आजचा त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला.
Tractor Accident Shirala
Tractor Accident Shiralaesakal
Updated on
Summary

नकळत बापाकडून मुलाचा घात झाल्याने डोळ्यांसमोरच स्वप्नांचा चुराडा झाला.

शिराळा : येथील औद्योगिक वसाहतीत वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टरला (Tractor) धडकून वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हितेश सिहेनसिंग सिंगार (मध्य प्रदेश, सध्या औद्योगिक वसाहत, शिराळा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना काल (शुक्रवार) सकाळी साडेसात वाजता घडली.

या घटनेची फिर्याद मृत हितेशची आई किला सिहेनसिंग सिंगार (२५, औद्योगिक वसाहत, शिराळा) यांनी दिली आहे. चिमुकल्याचे वडील सिहेनसिंग पागला सिंगार (३०) याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिंगार कुटुंबीय चार महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात येथे आले आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीमध्ये मजुरी करत होते.

Tractor Accident Shirala
'त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही'; सुषमा अंधारें‍विरोधात शंभूराज देसाई आक्रमक, पाटण न्यायालयात दाखल केली तक्रार

सिहेनसिंग सिंगार काल सकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह मागे घेत असताना ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या चाकास हितेश धडकला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान यमगर यांनी त्याला मृत घोषित केले. हवालदार भाऊसाहेब कुंभार तपास करीत आहेत. हितेशच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचा मृतदेह मध्य प्रदेश येथील मूळ गावी अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आला.

Tractor Accident Shirala
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

स्वप्नांचा चुराडा

सिहेनसिंग सिंगार हा ३० वर्षांचा युवक मुलांच्या भविष्यासाठी कुटुंबासह उदरनिर्वाहानिमित्त महाराष्ट्रात आला. चार महिने सुखाने संसार सुरू होता. सिंगार कुटुंबीय मुलांच्या भविष्यासाठी राबत होते; पण आजचा त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. ज्याच्यासाठी आटापिटा सुरू होता. त्याचा मृत्यू आपल्या हातून होईल, याची पुसटशी कल्पना बापाला नव्हती. नकळत बापाकडून मुलाचा घात झाल्याने डोळ्यांसमोरच स्वप्नांचा चुराडा झाला. त्याचा मृतदेह गावाकडे नेताना उपस्थित मजूर व कंपनीतील अधिकारी व कर्मचारी गहिवरून गेले.

Tractor Accident Shirala
मुलीचं प्रियकराशी लग्न होऊ नये म्हणून 'अघोरी कृत्य'; स्मशानभूमीत पुरला मुलाचा फोटो, भोंदूबाबासह तिघांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shirala Nag Panchami 2026
Karad Ratnagiri highway school vehicle accident
Walchandnagar Police busted a tractor theft gang and seized ₹25 lakh worth of stolen property.
Best places to visit in Shirala during monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com